S M L

आता पुण्यातही गगनचुंबी इमारती

22 ऑक्टोबरमुंबईप्रमाणेच काही दिवसांमध्ये पुण्यातही आता उंच इमारती पहायला मिळणार आहे. कारण शहर सुधारणा समितीने मान्यता दिलेल्या जुन्या विकास आराखड्यामध्ये उंच इमारतींना परवानगी देण्याची तरतुद सुचवण्यात आली आहे. पुण्यामध्ये आत्तापर्यंत 100 मीटर म्हणजे जवळपास 27 मजल्यांपर्यंत उंच इमारत बांधायला परवानगी होती. आता शहरात 64 मजल्यांपर्यंत इमारती उभारल्या जाऊ शकतील. यामध्ये बदल करत 150 मीटर उंच इमारती बांधायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. पण शहर सुधारणा समितीने मुंबईच्या धर्तीवर 180 ते 200 मीटर उंच इमारती बांधायला परवानगी द्यावी अशी उपसुचना मांडली होती. शहर सुधारणा समितीने या विकास आराखड्याला मंजुरी दिली असून आता 25 तारखेला मुख्य सभेमध्ये हा आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2012 04:42 PM IST

आता पुण्यातही गगनचुंबी इमारती

22 ऑक्टोबर

मुंबईप्रमाणेच काही दिवसांमध्ये पुण्यातही आता उंच इमारती पहायला मिळणार आहे. कारण शहर सुधारणा समितीने मान्यता दिलेल्या जुन्या विकास आराखड्यामध्ये उंच इमारतींना परवानगी देण्याची तरतुद सुचवण्यात आली आहे. पुण्यामध्ये आत्तापर्यंत 100 मीटर म्हणजे जवळपास 27 मजल्यांपर्यंत उंच इमारत बांधायला परवानगी होती. आता शहरात 64 मजल्यांपर्यंत इमारती उभारल्या जाऊ शकतील. यामध्ये बदल करत 150 मीटर उंच इमारती बांधायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. पण शहर सुधारणा समितीने मुंबईच्या धर्तीवर 180 ते 200 मीटर उंच इमारती बांधायला परवानगी द्यावी अशी उपसुचना मांडली होती. शहर सुधारणा समितीने या विकास आराखड्याला मंजुरी दिली असून आता 25 तारखेला मुख्य सभेमध्ये हा आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2012 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close