S M L

मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकर्‍यांचा गोंधळ

20 ऑक्टोबरइंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेत आज गोंधळ झाला. नीरा-भीमा आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे इंदापूर दौर्‍यावर होते. निरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचं भाषण सुरू असताना ऊस दरावरून शेतकर्‍यांनी गोंधळ केला. तीच परिस्थिती कर्मयोगी साखर कारखान्यावर आली. दिवाळीचा हप्ता अवघा 200 रूपयांवर जाहीर केल्यामुळे शेतकर्‍यांनी घोषणाबाजी केली आणि सभागृहातून बाहेर पडले. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यातल्या शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2012 02:57 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकर्‍यांचा गोंधळ

20 ऑक्टोबर

इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेत आज गोंधळ झाला. नीरा-भीमा आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे इंदापूर दौर्‍यावर होते. निरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचं भाषण सुरू असताना ऊस दरावरून शेतकर्‍यांनी गोंधळ केला. तीच परिस्थिती कर्मयोगी साखर कारखान्यावर आली. दिवाळीचा हप्ता अवघा 200 रूपयांवर जाहीर केल्यामुळे शेतकर्‍यांनी घोषणाबाजी केली आणि सभागृहातून बाहेर पडले. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यातल्या शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2012 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close