S M L

प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचं निधन

21 ऑक्टोबरप्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचं आज निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेल्याकाही दिवसांपासून यश चोप्रा यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. त्यांना ़ डेंग्यू झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. पण आज संध्याकाळी त्यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. आपल्या कल्पनेतलं विश्‍व सेव्हेंटी एमएमच्या पडद्यावर कलात्मकरीत्या उतरवणारा हा एव्हरग्रीन दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला. हिंदी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक हीट सिनेमे देणार्‍या दिग्दर्शकापैकी यश चोप्रा हे एक. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 ला लाहोर येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या करिअरला सुरूवात त्यांनी बंधू बी.आर.चोप्रा यांच्यासोबत केली. सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं. या काळात त्यांनी धूल का फूल, धर्मपूत्र, वक्त, जोशीला, आदी यशस्वी सिनेमे बनवले. काही काळानंतर यश चोप्रा यांनी स्वत:हा दिग्दर्शक क्षेत्रात उतरले. आणि 1973 ला 'यशराज फिल्म' प्राडक्शन हाऊस स्थापन केलं. त्यांनी आपल्या प्राडक्शन हाऊसमधून पहिला सिनेमा 'डाग' निर्मित केला. पहिल्याच सिनेमाच्या यशानंतर त्यांनी एक-एक पाऊल टाकतं अनेक रोमँटिक, जगभराची सफर घडवणारे सदाबहार सिनेमे दिले. 1975 ला अमिताभ बच्चन यांना घेऊन दिवारा सिनेमा दिला. या सिनेमाच्या यशानंतर अमिताभ यांना 'ऍग्री यंग मॅन' अशी ओळख मिळाली. यापाठोपाठ त्यांनी 'कभी कभी', 'त्रिशूल' असे सिनेमे दिले. ऐंशीच्या दशकात यश चोप्रा यांनी संगितमय 'चांदणी' सिनेमा निर्मित करुन हिंदी सिनेमा सृष्टीला एक वेगळी ओळख दिली. या सिनेमाच्या अपार यशानंतर त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी या काळात अनेक कलाकारांना संधी दिली. त्यामध्ये शाहरुख खान चाही समावेश आहे. शाहरुख खानला घेऊन त्यांनी 'डर' हा सिनेमा बनवला. या सिनेमाच्या यशानंतर शाहरुख आणि यशराज फिल्म असं सुत्रच तयार झालं. 'दिल तो पागल है' आणि 'विर-झारा' आणि पुढील महिन्यात रिलीज होणार 'जब तक है जान' हा सिनेमा यश चोप्रा यांचा अखेरचा सिनेमा ठरला. मागिल महिन्यात 27 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी त्यांनी दिग्दर्शक क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. नऊ दिवसांपुर्वी त्यांनी मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असताना त्यांनी डेंगू असल्याचं निदान झालं. आणि आज अखेर यश चोप्रा यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2012 01:45 PM IST

प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचं निधन

21 ऑक्टोबर

प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचं आज निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेल्याकाही दिवसांपासून यश चोप्रा यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. त्यांना ़ डेंग्यू झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. पण आज संध्याकाळी त्यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. आपल्या कल्पनेतलं विश्‍व सेव्हेंटी एमएमच्या पडद्यावर कलात्मकरीत्या उतरवणारा हा एव्हरग्रीन दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला.

हिंदी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक हीट सिनेमे देणार्‍या दिग्दर्शकापैकी यश चोप्रा हे एक. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 ला लाहोर येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या करिअरला सुरूवात त्यांनी बंधू बी.आर.चोप्रा यांच्यासोबत केली. सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं. या काळात त्यांनी धूल का फूल, धर्मपूत्र, वक्त, जोशीला, आदी यशस्वी सिनेमे बनवले. काही काळानंतर यश चोप्रा यांनी स्वत:हा दिग्दर्शक क्षेत्रात उतरले. आणि 1973 ला 'यशराज फिल्म' प्राडक्शन हाऊस स्थापन केलं. त्यांनी आपल्या प्राडक्शन हाऊसमधून पहिला सिनेमा 'डाग' निर्मित केला. पहिल्याच सिनेमाच्या यशानंतर त्यांनी एक-एक पाऊल टाकतं अनेक रोमँटिक, जगभराची सफर घडवणारे सदाबहार सिनेमे दिले. 1975 ला अमिताभ बच्चन यांना घेऊन दिवारा सिनेमा दिला. या सिनेमाच्या यशानंतर अमिताभ यांना 'ऍग्री यंग मॅन' अशी ओळख मिळाली.

यापाठोपाठ त्यांनी 'कभी कभी', 'त्रिशूल' असे सिनेमे दिले. ऐंशीच्या दशकात यश चोप्रा यांनी संगितमय 'चांदणी' सिनेमा निर्मित करुन हिंदी सिनेमा सृष्टीला एक वेगळी ओळख दिली. या सिनेमाच्या अपार यशानंतर त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी या काळात अनेक कलाकारांना संधी दिली. त्यामध्ये शाहरुख खान चाही समावेश आहे. शाहरुख खानला घेऊन त्यांनी 'डर' हा सिनेमा बनवला. या सिनेमाच्या यशानंतर शाहरुख आणि यशराज फिल्म असं सुत्रच तयार झालं. 'दिल तो पागल है' आणि 'विर-झारा' आणि पुढील महिन्यात रिलीज होणार 'जब तक है जान' हा सिनेमा यश चोप्रा यांचा अखेरचा सिनेमा ठरला. मागिल महिन्यात 27 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी त्यांनी दिग्दर्शक क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. नऊ दिवसांपुर्वी त्यांनी मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असताना त्यांनी डेंगू असल्याचं निदान झालं. आणि आज अखेर यश चोप्रा यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2012 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close