S M L

गडकरींच्या पूर्ती ग्रुपची इन्कमटॅक्स विभागाकडून चौकशी

25 ऑक्टोबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणखी अडचणीत सापडले आहे. गडकरींच्या पूर्ती पॉवर आणि शुगर लिमिटेड कंपन्यांची इन्कमटॅक्स विभाग चौकशी करतं आहे. या चौकशीनंतर इन्कमटॅक्स विभाग आपला रिपोर्ट सीबीडीटीला देणार आहे. पूर्तीत गुंतवणूक करणार्‍या 18 कंपन्यांच्या पैश्याच्या स्त्रोताविषयी माहिती घेणार आहे. गरज पडल्यास नितीन गडकरींनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याची शक्यता आहे. गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये 18 बेनामी कंपन्याचे शेअर असल्याचं अलीकडेच उघड झालंय. या कंपन्यांनी आपला पत्ता मुंबईतील अंधेरी भागातील झोपडपट्टीतला दिला आहे. पण सदरील ठिकाणी तपासणी केली असता ही बाब उघड झाली. तर दुसरीकडे गडकरींना संघाने अभय दिलं आहे. गडकरींच्या ही चुक पोटात घेऊन संघ गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. तर भाजपचे जेष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी गडकरींच्या बचावासाठी मैदाना उतरले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2012 09:53 AM IST

गडकरींच्या पूर्ती ग्रुपची इन्कमटॅक्स विभागाकडून चौकशी

25 ऑक्टोबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणखी अडचणीत सापडले आहे. गडकरींच्या पूर्ती पॉवर आणि शुगर लिमिटेड कंपन्यांची इन्कमटॅक्स विभाग चौकशी करतं आहे. या चौकशीनंतर इन्कमटॅक्स विभाग आपला रिपोर्ट सीबीडीटीला देणार आहे. पूर्तीत गुंतवणूक करणार्‍या 18 कंपन्यांच्या पैश्याच्या स्त्रोताविषयी माहिती घेणार आहे. गरज पडल्यास नितीन गडकरींनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याची शक्यता आहे. गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये 18 बेनामी कंपन्याचे शेअर असल्याचं अलीकडेच उघड झालंय. या कंपन्यांनी आपला पत्ता मुंबईतील अंधेरी भागातील झोपडपट्टीतला दिला आहे. पण सदरील ठिकाणी तपासणी केली असता ही बाब उघड झाली. तर दुसरीकडे गडकरींना संघाने अभय दिलं आहे. गडकरींच्या ही चुक पोटात घेऊन संघ गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. तर भाजपचे जेष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी गडकरींच्या बचावासाठी मैदाना उतरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2012 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close