S M L

एस एम कृष्णांचा राजीनामा

26 ऑक्टोबरकेंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी राजीनामा दिला आहे. कृष्णा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आपला राजीनामा पाठवलाय. नवीन चेहर्‍यांना संधी मिळावी, अशी आपली इच्छा असल्याचं कृष्णा यांनी स्पष्ट केलंय. तसंच कोणत्याही अटीशिवाय आपण पक्षकार्य करणार असल्याचं कृष्णा यांनी म्हटलंय.कृष्णांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला. एस. एम कृष्णा कर्नाटकमध्ये पक्षकार्य करणार, असं सूत्रांकडून समजतंय. त्यांच्यासोबतच इतर अनेक वरिष्ठ मंत्री पक्षकार्यासाठी पाठवले जातील, अशी शक्यता आहे. त्यांच्या जागी तरुण चेहर्‍यांना कॅबिनेटपदी बढती मिळणार आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींना काँग्रेसचं कार्याध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या तारीक अन्वर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी दाट शक्यता आहे. तर सामाजिक न्याय आणि रोजगार मंत्री मुकुल वासनिक आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनीही पक्षाचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तर पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय राजीनामा देणार आहेत. आयटी तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनाही कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची कॅबिनेटपदी बढती होईल. तसेच माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सचिन पायलट यांनाही पदोन्नती मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2012 12:19 PM IST

एस एम कृष्णांचा राजीनामा

26 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी राजीनामा दिला आहे. कृष्णा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आपला राजीनामा पाठवलाय. नवीन चेहर्‍यांना संधी मिळावी, अशी आपली इच्छा असल्याचं कृष्णा यांनी स्पष्ट केलंय. तसंच कोणत्याही अटीशिवाय आपण पक्षकार्य करणार असल्याचं कृष्णा यांनी म्हटलंय.कृष्णांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला. एस. एम कृष्णा कर्नाटकमध्ये पक्षकार्य करणार, असं सूत्रांकडून समजतंय. त्यांच्यासोबतच इतर अनेक वरिष्ठ मंत्री पक्षकार्यासाठी पाठवले जातील, अशी शक्यता आहे. त्यांच्या जागी तरुण चेहर्‍यांना कॅबिनेटपदी बढती मिळणार आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींना काँग्रेसचं कार्याध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या तारीक अन्वर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी दाट शक्यता आहे. तर सामाजिक न्याय आणि रोजगार मंत्री मुकुल वासनिक आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनीही पक्षाचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तर पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय राजीनामा देणार आहेत. आयटी तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनाही कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची कॅबिनेटपदी बढती होईल. तसेच माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सचिन पायलट यांनाही पदोन्नती मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2012 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close