S M L

गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये 19 कंपन्या बेनामी

23 ऑक्टोबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींचा पूर्ती ग्रुप वादाच्या भोवर्‍यात सापडलाय. पूर्तीमध्ये 80 टक्के शेअर्स असलेल्या 19 कंपन्या बेनामी असल्याचा आरोप होतोय. रजिस्ट्रेशन करताना या कंपन्यांनी जे पत्ते दिले होते त्या पत्त्यांवर सध्या या कंपन्या अस्तित्वातच नसल्याचं उघड झालंय.आयआरबीनं पूर्ती ग्रुपला 165 कोटींचं कर्ज दिल्याचीही माहिती आहे. पूर्ती ग्रुपनं मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पण काँग्रेसनं मात्र आक्रमक भूमिका घेत गडकरींच्या व्यवहारांच्या चौकशीची मागणी केलीय. तर भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी गडकरींच्या राजीनाम्याचीच मागणी केलीय. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या नितीन गडकरींच्या पूर्ती ग्रुपच्या काही कंपन्यांचे पत्ते आहेत मुंबईतल्या चाळीं आणि झोपडपट्टीतले...या कंपन्यांच्या संचालक मंडळात गडकरींचा ड्रायव्हर, अकाऊंटंट आणि इतर कर्मचार्‍यांची नावं आहेत. पूर्ती ग्रुपमध्ये गुंतवणूक करणार्‍या 19 कंपन्यांचा इमेल आयडी एकच देण्यात आला आहे. बेनामी असल्याचे आरोप असणार्‍या या कंपन्यांचे पूर्ती ग्रुपमध्ये 80 टक्के शेअर्स आहेत. गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना आयआरबीला कॉन्ट्रॅक्टस देण्यात आले. आणि त्यानंतर दोन वर्षांनी आयआरबीनं पूर्ती ग्रुपला 165 कोटींचं कर्ज दिल्याची माहिती आहे. पण पूर्ती ग्रुपनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आता काँग्रेसनं गडकरींच्या चौकशीची मागणी केलीय. इतकंच नाही दिग्विजय सिंह यांनी तर गडकरींविरोधात पुरावे असल्याचं पत्र पंतप्रधानांना लिहिलंय.रॉबर्ट वडरा सलमान खुर्शीद यांच्या चौकशीची गरज नसल्याचं ठासून सांगणार्‍या काँग्रेसची ही दुटप्पी भूमिका आहे. पण भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी मात्र गडकरींना घरचा अहेर दिलाय. गडकरींना दुसर्‍यांदा अध्यक्षपदाची संधी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केलीय. उद्योगपती आणि राजकारणी अशी दुहेरी भूमिका निभावणारे गडकरी दुसर्‍यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होत असताना त्यांच्यावर आरोपांची राळ उडालीय. म्हणूनच 2014 च्या निवडणुकीत भाजपला सत्तेवर आणण्याचं स्वप्न पाहणार्‍या गडकरींसाठी पुढचा मार्ग खडतर ठरू शकतो.गडकरींच्या कंपन्या झोपडपट्टीतपूर्ती ग्रुपच्या निविता ट्रेड्स, स्वीफ्टसोल, रिगमा फिनट्रेड, अश्विनी सेल्स आणि मार्केटींग आणि अर्नवेल ट्रेडस... या कंपन्यांचं जो पत्ता दाखवण्यात आला आहे. तो आहे अंधेरीतल्या एका चाळीतला. दुबे चाळ जिथून या कंपन्यांचं काम चालतं असं कागदावर दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, नितीन गडकरी अडचणीत आले असताना पहिल्यांदाच पूर्ती ग्रुपनं या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. पूर्ती ग्रुप शुगरचे एमडी सुधीर दिवे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहे. नितीन गडकरी यांचा पूर्तीशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे कुठल्याही चौकशीसाठी पूर्ती ग्रुप तयार असल्याचं सुधीर दिवे यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2012 10:46 AM IST

गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये 19 कंपन्या बेनामी

23 ऑक्टोबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींचा पूर्ती ग्रुप वादाच्या भोवर्‍यात सापडलाय. पूर्तीमध्ये 80 टक्के शेअर्स असलेल्या 19 कंपन्या बेनामी असल्याचा आरोप होतोय. रजिस्ट्रेशन करताना या कंपन्यांनी जे पत्ते दिले होते त्या पत्त्यांवर सध्या या कंपन्या अस्तित्वातच नसल्याचं उघड झालंय.आयआरबीनं पूर्ती ग्रुपला 165 कोटींचं कर्ज दिल्याचीही माहिती आहे. पूर्ती ग्रुपनं मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पण काँग्रेसनं मात्र आक्रमक भूमिका घेत गडकरींच्या व्यवहारांच्या चौकशीची मागणी केलीय. तर भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी गडकरींच्या राजीनाम्याचीच मागणी केलीय.

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या नितीन गडकरींच्या पूर्ती ग्रुपच्या काही कंपन्यांचे पत्ते आहेत मुंबईतल्या चाळीं आणि झोपडपट्टीतले...या कंपन्यांच्या संचालक मंडळात गडकरींचा ड्रायव्हर, अकाऊंटंट आणि इतर कर्मचार्‍यांची नावं आहेत. पूर्ती ग्रुपमध्ये गुंतवणूक करणार्‍या 19 कंपन्यांचा इमेल आयडी एकच देण्यात आला आहे. बेनामी असल्याचे आरोप असणार्‍या या कंपन्यांचे पूर्ती ग्रुपमध्ये 80 टक्के शेअर्स आहेत. गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना आयआरबीला कॉन्ट्रॅक्टस देण्यात आले. आणि त्यानंतर दोन वर्षांनी आयआरबीनं पूर्ती ग्रुपला 165 कोटींचं कर्ज दिल्याची माहिती आहे. पण पूर्ती ग्रुपनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

आता काँग्रेसनं गडकरींच्या चौकशीची मागणी केलीय. इतकंच नाही दिग्विजय सिंह यांनी तर गडकरींविरोधात पुरावे असल्याचं पत्र पंतप्रधानांना लिहिलंय.रॉबर्ट वडरा सलमान खुर्शीद यांच्या चौकशीची गरज नसल्याचं ठासून सांगणार्‍या काँग्रेसची ही दुटप्पी भूमिका आहे. पण भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी मात्र गडकरींना घरचा अहेर दिलाय. गडकरींना दुसर्‍यांदा अध्यक्षपदाची संधी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केलीय. उद्योगपती आणि राजकारणी अशी दुहेरी भूमिका निभावणारे गडकरी दुसर्‍यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होत असताना त्यांच्यावर आरोपांची राळ उडालीय. म्हणूनच 2014 च्या निवडणुकीत भाजपला सत्तेवर आणण्याचं स्वप्न पाहणार्‍या गडकरींसाठी पुढचा मार्ग खडतर ठरू शकतो.

गडकरींच्या कंपन्या झोपडपट्टीत

पूर्ती ग्रुपच्या निविता ट्रेड्स, स्वीफ्टसोल, रिगमा फिनट्रेड, अश्विनी सेल्स आणि मार्केटींग आणि अर्नवेल ट्रेडस... या कंपन्यांचं जो पत्ता दाखवण्यात आला आहे. तो आहे अंधेरीतल्या एका चाळीतला. दुबे चाळ जिथून या कंपन्यांचं काम चालतं असं कागदावर दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, नितीन गडकरी अडचणीत आले असताना पहिल्यांदाच पूर्ती ग्रुपनं या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. पूर्ती ग्रुप शुगरचे एमडी सुधीर दिवे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहे. नितीन गडकरी यांचा पूर्तीशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे कुठल्याही चौकशीसाठी पूर्ती ग्रुप तयार असल्याचं सुधीर दिवे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2012 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close