S M L

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी फसीहला अटक

22 ऑक्टोबरदिल्ली आणि बंगलोर बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी फसीह मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी दिल्ली एअरपोर्टवर त्याला अटक करण्यात आली. फसीह मोहम्मद हा बंगळुरू आणि दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी हवा होता. सौदी अरेबियात तो इंजीनियर म्हणून नोकरी करत होता. त्याला अलीकडेच सौदी अरेबियात अटक करण्यात आल्याची बातमी दिल्ली पोलिसांना कळाली. तातडीने दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केली. फसीहच्या विरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली. आणि अखेर पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलं. सौदी अरेबियातून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आलं. आज सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळावर फसीहला अटक करण्यात आली. मुंबई 26/11 हल्ल्यातील मुख्य सुत्रधार अबू जुंदलच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांना आणखी दहशतवाद्याला अटक करण्यात यश मिळालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2012 09:38 AM IST

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी फसीहला अटक

22 ऑक्टोबर

दिल्ली आणि बंगलोर बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी फसीह मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी दिल्ली एअरपोर्टवर त्याला अटक करण्यात आली. फसीह मोहम्मद हा बंगळुरू आणि दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी हवा होता. सौदी अरेबियात तो इंजीनियर म्हणून नोकरी करत होता. त्याला अलीकडेच सौदी अरेबियात अटक करण्यात आल्याची बातमी दिल्ली पोलिसांना कळाली. तातडीने दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केली. फसीहच्या विरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली. आणि अखेर पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलं. सौदी अरेबियातून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आलं. आज सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळावर फसीहला अटक करण्यात आली. मुंबई 26/11 हल्ल्यातील मुख्य सुत्रधार अबू जुंदलच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांना आणखी दहशतवाद्याला अटक करण्यात यश मिळालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2012 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close