S M L

औरंगाबामध्ये युतीच्या नगरसेवकांची टूर निघाली

25 ऑक्टोबरऔरंगाबाद महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या वतीनं महापौरपदासाठी श्रीमती कला ओझा यांचा अर्ज दाखल केला. तर भाजपाच्या वतीनं उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या 30 नगरसेवकांचा जथ्था टूरवर निघाला आहे. युतीमधला कोणता उमेदवार फुटू नये यासाठी युतीकडून प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी 51 नगरसेवकांचा आकडा युतीकडे आहे तर आघाडीकडे 48 नगरसेवक आहेत, त्यामुळं युतीमधला कोणताही नगरसेवक फुटू नये आणि कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2012 10:18 AM IST

औरंगाबामध्ये युतीच्या नगरसेवकांची टूर निघाली

25 ऑक्टोबर

औरंगाबाद महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या वतीनं महापौरपदासाठी श्रीमती कला ओझा यांचा अर्ज दाखल केला. तर भाजपाच्या वतीनं उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या 30 नगरसेवकांचा जथ्था टूरवर निघाला आहे. युतीमधला कोणता उमेदवार फुटू नये यासाठी युतीकडून प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी 51 नगरसेवकांचा आकडा युतीकडे आहे तर आघाडीकडे 48 नगरसेवक आहेत, त्यामुळं युतीमधला कोणताही नगरसेवक फुटू नये आणि कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2012 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close