S M L

अखेर जायकवाडी धरणात पाणी पोहचले

25 ऑक्टोबरभंडारदरा धरणातून सोडलेलं अडीच टीएमसी पाणी पहाटे जायकवाडी धरणात पोहचले. रविवारी सकाळी भंडारदरा धरणातून सोडलेलं पाणी पाचव्या दिवशी जायकवाडीत आलं. 210 किलोमीटरचं अंतर पार करताना कोरडं पडलेलं नदीपात्र आणि बेसुमार वाळू उपसा यामुळं पाणी पोहोचण्यास उशीर झाला. आता जायकवाडी धरणात धीम्या गतीनं पाणी येतंय.आता अडीच टीएमसी सोडलेल्या पाण्यातून जायकवाडी धरणात किती पाणी पोहोचेल हे आणखी दोन दिवसानंतरच कळेल. सध्या जायकवाडीत अडीच टीएमसी पाणी आहे. भंडारदरा धरणातून सोडलेलं अडीच टीएमसी पाणी पहाटे जायकवाडीत पोहोचलं. जायकवाडीत साधारण दीड टीएमसी पाणी मिळेल. हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यात येईल आणि हे पाणी जूनपर्यंत पुरेल अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2012 10:25 AM IST

अखेर जायकवाडी धरणात पाणी पोहचले

25 ऑक्टोबर

भंडारदरा धरणातून सोडलेलं अडीच टीएमसी पाणी पहाटे जायकवाडी धरणात पोहचले. रविवारी सकाळी भंडारदरा धरणातून सोडलेलं पाणी पाचव्या दिवशी जायकवाडीत आलं. 210 किलोमीटरचं अंतर पार करताना कोरडं पडलेलं नदीपात्र आणि बेसुमार वाळू उपसा यामुळं पाणी पोहोचण्यास उशीर झाला. आता जायकवाडी धरणात धीम्या गतीनं पाणी येतंय.आता अडीच टीएमसी सोडलेल्या पाण्यातून जायकवाडी धरणात किती पाणी पोहोचेल हे आणखी दोन दिवसानंतरच कळेल. सध्या जायकवाडीत अडीच टीएमसी पाणी आहे. भंडारदरा धरणातून सोडलेलं अडीच टीएमसी पाणी पहाटे जायकवाडीत पोहोचलं. जायकवाडीत साधारण दीड टीएमसी पाणी मिळेल. हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यात येईल आणि हे पाणी जूनपर्यंत पुरेल अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2012 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close