S M L

'सार्वजनिक बांधकाम' निधी गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरूच

26 ऑक्टोबरसार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व परिमंडळांना वार्षिक निधीमध्ये गैरव्यवहाराप्रकरणी सहा महिन्यापुर्वी एफआयआर दाखल करून सुद्धा अजूनही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालुवर्षी 2011-12 या वर्षासाठी मुंबई इलाखा परिमंडळासाठी 35 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला. हा निधी दक्षिण मंुबईतल्या मंत्रालय आणि विधानभवनासह सर्व शासकीय इमारतींच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी होता. पण परिमंडळाचे कार्यकारी अभियंता स्वामीदास चौबे यांनी काही कर्मचार्‍यांना हाताशी धरून बोगस बिलं काढत तब्बल 148 कोटी 48 लाख रुपयांच्या कामाचे चेक कंत्राटदारांना दिले. महत्त्वाचं म्हणजे, हे चेक वटलेसुद्धा. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे 112 कोटी 58 लाख रुपये बुडाले. या घोटाळ्याविरोधात गेल्या एप्रिल महिन्यात मुंबई परिमंडळाचे अधीक्षक अभियंता उल्हास देबडवार यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. पण सहा महिन्यांनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2012 03:36 PM IST

'सार्वजनिक बांधकाम' निधी गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरूच

26 ऑक्टोबर

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व परिमंडळांना वार्षिक निधीमध्ये गैरव्यवहाराप्रकरणी सहा महिन्यापुर्वी एफआयआर दाखल करून सुद्धा अजूनही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालुवर्षी 2011-12 या वर्षासाठी मुंबई इलाखा परिमंडळासाठी 35 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला. हा निधी दक्षिण मंुबईतल्या मंत्रालय आणि विधानभवनासह सर्व शासकीय इमारतींच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी होता. पण परिमंडळाचे कार्यकारी अभियंता स्वामीदास चौबे यांनी काही कर्मचार्‍यांना हाताशी धरून बोगस बिलं काढत तब्बल 148 कोटी 48 लाख रुपयांच्या कामाचे चेक कंत्राटदारांना दिले. महत्त्वाचं म्हणजे, हे चेक वटलेसुद्धा. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे 112 कोटी 58 लाख रुपये बुडाले. या घोटाळ्याविरोधात गेल्या एप्रिल महिन्यात मुंबई परिमंडळाचे अधीक्षक अभियंता उल्हास देबडवार यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. पण सहा महिन्यांनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2012 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close