S M L

टोलविरोधात मनसे आता कोर्टात लढणार

26 ऑक्टोबरटोलच्या प्रश्नावर आंदोलन केल्यानंतर आता मनसे हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. टोलचा कारभार पारदर्शक व्हावा अशी मागणीही मनसेनं केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच मनसेनं यासंदर्भात टोल विरोधात आंदोलन केलं होतं. याच मुद्यावरुन राज ठाकरेंनी कालच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेतली होती. 'टोल भरू नका' असा आवाहन मनसेचे अधक्ष्या राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसेसैनिकांनी एकच टोल नाक्यांवर हल्लाबोल केला होती आणि टोल नाके बंद पाडले होते. टोल नाक्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची लूट होतेय, टोल नाक्यांची मुदत संपून सुद्धा लोकांकडून टोल घेतले जातात असा आरोप राज यांनी केला होता. राज यांच्या या आंदोलनामुळे जनतेनंही मोठ्या दिलाने स्वागत केलं होतं. मनसेचे कार्यकर्ते प्रत्येक टोलनाक्यावर जातीने लक्ष देऊन माहिती गोळा करत होते पण आंदोलन संपले आणि सगळे काही जैसे थे झाले. अखेर गुद्यावरून मनसे आता मुद्यावर कोर्टात लढणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2012 05:35 PM IST

टोलविरोधात मनसे आता कोर्टात लढणार

26 ऑक्टोबर

टोलच्या प्रश्नावर आंदोलन केल्यानंतर आता मनसे हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. टोलचा कारभार पारदर्शक व्हावा अशी मागणीही मनसेनं केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच मनसेनं यासंदर्भात टोल विरोधात आंदोलन केलं होतं. याच मुद्यावरुन राज ठाकरेंनी कालच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेतली होती. 'टोल भरू नका' असा आवाहन मनसेचे अधक्ष्या राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसेसैनिकांनी एकच टोल नाक्यांवर हल्लाबोल केला होती आणि टोल नाके बंद पाडले होते. टोल नाक्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची लूट होतेय, टोल नाक्यांची मुदत संपून सुद्धा लोकांकडून टोल घेतले जातात असा आरोप राज यांनी केला होता. राज यांच्या या आंदोलनामुळे जनतेनंही मोठ्या दिलाने स्वागत केलं होतं. मनसेचे कार्यकर्ते प्रत्येक टोलनाक्यावर जातीने लक्ष देऊन माहिती गोळा करत होते पण आंदोलन संपले आणि सगळे काही जैसे थे झाले. अखेर गुद्यावरून मनसे आता मुद्यावर कोर्टात लढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2012 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close