S M L

हायकोर्टाजवळ फोर्ड गाडीत मृतदेह

2 डिसेंबर, मुंबई मुंबई हायकोर्टाजवळ फोर्ड गाडीत आकाश सबरवाल या विद्यार्थ्याचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलाय. आकाश 30 नोव्हेंबरपासून घरातून गायब असल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी पोलिसात नोंदवली होती. त्यानंतर आज सकाळी आकाशचा मृतदेह सापडलाय. आकाशच्या मृतदेहाजवळ मुंबईच्या लाला कॉलेजचं ओळखपत्र सापडलंय. ज्या गाडीतून आकाशचा मृतदेह सापडला ती गाडी सिल्व्हम ट्रॅव्हल्स कंपनीची टुरिस्ट गाडी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.हा मृतदेह फोर्ड गाडीत सापडलाय. मृतदेहाजवळ मुंबईतल्याच लाला कॉलेजचं आयकार्डही सापडलंय. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहचलं असून त्यांची पाहणी सुरू आहे. फोर्ड गाडीचा नंबर एमएच 01 - 8269 असून पोलीस तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2008 05:26 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2008 05:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close