S M L

'गड'करींनी राखला, भाजप पाठीशी

26 ऑक्टोबरनितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देतील ही बातमी साफ चुकीची आहे. त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. गडकरींवरील सर्व आरोप बिनबुडाचे आहे असं स्पष्टीकरण प्रकाश जाव़डेकर यांनी केलं. आज शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत गडकरींच्या निवासस्थानी कोअर कमिटीच्या बैठक पार पडली. तब्बल दीड तास ही बैठक पार पडली. या बैठकीत गडकरींनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा केला. पक्ष जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं मत गडकरींनी स्पष्ट केलं आहे. नितीन गडकरींनी शेतकर्‍यांची जमीन लाटली असा गौप्यस्फोट करून केजरीवाल आणि त्यांच्या टीमने एकच गोंधळ उडवून दिला पण गडकरींनीही आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या पाठीशी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज, अरूण जेटली धावून आले. एव्हान जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही मैदानात उतरले. तिकडे संघानेही गडकरींना अभय दिलं. पण गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची प्रकरण रोजरोज बाहेर येऊ लागल्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली. पूर्ती ग्रुपमध्ये 19 बेनामी कंपन्या आणि त्यांचे पत्ते मुंबईतील झोपडपट्टीत असल्याचं समोरं आलं. मात्र तरी सुद्धा संघाने आरोपांचे खंडन करत गडकरींच्या छोट्या चुकासमजून माफ केल्यात. आणि दुसर्‍या टर्मची माळ गडकरींच्या गळ्यात घातली आहे. आज दिल्लीत भाजपची कोअर कमिटीच्या बैठकी पडली. गडकरींच्या राजीनाम्याचा प्रश्न नाही असं भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. गडकरी उद्यापासून नियोजित हिमाचल दौर्‍यावर जाणार असल्याचंही सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2012 05:18 PM IST

'गड'करींनी राखला, भाजप पाठीशी

26 ऑक्टोबर

नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देतील ही बातमी साफ चुकीची आहे. त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. गडकरींवरील सर्व आरोप बिनबुडाचे आहे असं स्पष्टीकरण प्रकाश जाव़डेकर यांनी केलं. आज शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत गडकरींच्या निवासस्थानी कोअर कमिटीच्या बैठक पार पडली. तब्बल दीड तास ही बैठक पार पडली. या बैठकीत गडकरींनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा केला. पक्ष जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं मत गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

नितीन गडकरींनी शेतकर्‍यांची जमीन लाटली असा गौप्यस्फोट करून केजरीवाल आणि त्यांच्या टीमने एकच गोंधळ उडवून दिला पण गडकरींनीही आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या पाठीशी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज, अरूण जेटली धावून आले. एव्हान जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही मैदानात उतरले. तिकडे संघानेही गडकरींना अभय दिलं. पण गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची प्रकरण रोजरोज बाहेर येऊ लागल्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली. पूर्ती ग्रुपमध्ये 19 बेनामी कंपन्या आणि त्यांचे पत्ते मुंबईतील झोपडपट्टीत असल्याचं समोरं आलं. मात्र तरी सुद्धा संघाने आरोपांचे खंडन करत गडकरींच्या छोट्या चुकासमजून माफ केल्यात. आणि दुसर्‍या टर्मची माळ गडकरींच्या गळ्यात घातली आहे. आज दिल्लीत भाजपची कोअर कमिटीच्या बैठकी पडली. गडकरींच्या राजीनाम्याचा प्रश्न नाही असं भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. गडकरी उद्यापासून नियोजित हिमाचल दौर्‍यावर जाणार असल्याचंही सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2012 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close