S M L

विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचं अपघाती निधन

25 ऑक्टोबरप्रसिद्ध विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचं आज निधन झालं. 'पॉवर कट'या सिनेमाच्या प्रमोशनहून परतत असताना त्यांची कार ट्रकवर आदळली त्यात त्यांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये जालंधरजवळ शाहकोटला हा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मुलगा, आणि सिनेमाची हिरॉईनही जखमी झाले आहेत. जसपाल भट्टींनी आपल्या विनोदानं एक काळ गाजवला. फ्लॉप शो, उलटा-पुलटा या त्यांच्या सीरीयल्स प्रचंड गाजल्या. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आपल्या विनोदी शैलीतून चिमटे काढले. टीव्ही गाजवणार्‍या जसपाल भट्टींनी, जवळपास 30 पेक्षा जास्त पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात.विनोदाच्या बादशाहाचं हे अचानक जाणं अनेकांना चटका लावून गेलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2012 11:22 AM IST

विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचं अपघाती निधन

25 ऑक्टोबर

प्रसिद्ध विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचं आज निधन झालं. 'पॉवर कट'या सिनेमाच्या प्रमोशनहून परतत असताना त्यांची कार ट्रकवर आदळली त्यात त्यांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये जालंधरजवळ शाहकोटला हा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मुलगा, आणि सिनेमाची हिरॉईनही जखमी झाले आहेत. जसपाल भट्टींनी आपल्या विनोदानं एक काळ गाजवला. फ्लॉप शो, उलटा-पुलटा या त्यांच्या सीरीयल्स प्रचंड गाजल्या. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आपल्या विनोदी शैलीतून चिमटे काढले. टीव्ही गाजवणार्‍या जसपाल भट्टींनी, जवळपास 30 पेक्षा जास्त पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात.विनोदाच्या बादशाहाचं हे अचानक जाणं अनेकांना चटका लावून गेलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2012 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close