S M L

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाला रविवारचा मुहूर्त

25 ऑक्टोबरकेंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरविस्तार रविवारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्यातली फेरबदलाबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे. फेरबदलांमध्ये राहुल गांधींच्या जवळ असणार्‍या तरुण चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पण राहुल गांधी मंत्रिमंडळात सहभागी होतील की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. ज्योतिरादित्य सिंधीया आणि सचिन पायलट यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मनीष तिवारी, दीपा दासमुन्शी आणि अभिनेता चिरंजीवी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि वीरप्पा मोईली यांच्याकडे असणारा अतिरिक्त खात्यांचा भार कमी केला जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अगाथा संगमा यांना हटवून तारीक अन्वर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2012 12:43 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाला रविवारचा मुहूर्त

25 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरविस्तार रविवारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्यातली फेरबदलाबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे. फेरबदलांमध्ये राहुल गांधींच्या जवळ असणार्‍या तरुण चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पण राहुल गांधी मंत्रिमंडळात सहभागी होतील की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. ज्योतिरादित्य सिंधीया आणि सचिन पायलट यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मनीष तिवारी, दीपा दासमुन्शी आणि अभिनेता चिरंजीवी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि वीरप्पा मोईली यांच्याकडे असणारा अतिरिक्त खात्यांचा भार कमी केला जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अगाथा संगमा यांना हटवून तारीक अन्वर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2012 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close