S M L

मराठवाड्यासाठी पाण्याची वाट बिकटच

23 ऑक्टोबररविवारी सकाळी आठ वाजता भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाच हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले. 170 किलोमीटरवरच्या औरंगाबादच्या जायकवाडी धरणात अडीच दिवसात हे पाणी पोचणार असल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात साठ तास उलटले तरी हे पाणी अजून मध्यावरच पोहोचलं आहे. दुष्काळामुळे नदी कोरडी आहे. तसंच वाळू लिलावामुळे नदीत मोठमोठे खड्डे झाले आहेत. त्यामुळे सोडलेल्या अडीच टीएमसी पाण्यापैकी फक्त दीड टीएमसी पाणीच मराठवाड्याला मिळण्याची शक्यता आहे. रविवारी सोडण्यात आलेल्या या पाण्याने 110 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत श्रीरामपूर तालुका गाठला आहे. कदाचित उद्या रात्री हे पाणी नगर जिल्ह्यातून सीमोल्लंघन करत औरंगाबादच्या जायकवाडी धरणात मिळणार आहे. दरम्यान, आधी आमचे बंधारे भरून द्या या मागणीसाठी नगरमधल्या शेतकर्‍यांची आंदोलनं सुरू आहेत. कोरेगावच्या गावकर्‍यांनी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूरमध्ये नदीपात्रात उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2012 02:50 PM IST

मराठवाड्यासाठी पाण्याची वाट बिकटच

23 ऑक्टोबर

रविवारी सकाळी आठ वाजता भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाच हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले. 170 किलोमीटरवरच्या औरंगाबादच्या जायकवाडी धरणात अडीच दिवसात हे पाणी पोचणार असल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात साठ तास उलटले तरी हे पाणी अजून मध्यावरच पोहोचलं आहे. दुष्काळामुळे नदी कोरडी आहे. तसंच वाळू लिलावामुळे नदीत मोठमोठे खड्डे झाले आहेत. त्यामुळे सोडलेल्या अडीच टीएमसी पाण्यापैकी फक्त दीड टीएमसी पाणीच मराठवाड्याला मिळण्याची शक्यता आहे. रविवारी सोडण्यात आलेल्या या पाण्याने 110 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत श्रीरामपूर तालुका गाठला आहे. कदाचित उद्या रात्री हे पाणी नगर जिल्ह्यातून सीमोल्लंघन करत औरंगाबादच्या जायकवाडी धरणात मिळणार आहे. दरम्यान, आधी आमचे बंधारे भरून द्या या मागणीसाठी नगरमधल्या शेतकर्‍यांची आंदोलनं सुरू आहेत. कोरेगावच्या गावकर्‍यांनी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूरमध्ये नदीपात्रात उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2012 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close