S M L

राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

25 ऑक्टोबरआज राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. एमएमआरडीएच्या जमिनीवरील इमारतींचा बांधकाम कालावधी वाढवण्याच्या निर्णयावरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. इमारतींचं बांधकाम 4 वर्षात पूर्ण करण्याची अट होती. पण बहुतेक इमारतींचं बांधकाम पूर्ण झालं नाही. त्यामुळे 2 दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवला आणि बिल्डर्सना फायदा पोहोचवण्यासाठी कालावधी 2 वर्षांनी वाढवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय बिल्डर धार्जिणा असून यात काळंबेरं आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.आधी राज्य सहकारी बँक आणि नंतर सिंचन श्वेतपत्रिकेचा मुद्दयावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी केली. त्यातच सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर छगन भुजबळ, सनिल तटकरे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधातील याचिका हायकोर्टात पोहोचल्या. एवढं सगळं झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांच्याविरोधातली नाराजी उफाळून येणं स्वाभावीक आहे. म्हणूनच आता राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एमएमआरडीएवर टीका केली. एमएमआरडीएच्या जमिनीवरील बांधकामाची कालमर्यादा आधी दोन वर्षांनी वाढवली आणि नंतर स्थगित का केली, असा सवाल राष्ट्रवादीने विचारलाय. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काही सापडतंय या याचा बारकाईनं अभ्यास करण्यात सध्या राष्ट्रवादीचे व्युहरचनाकार सध्या व्यस्त आहेत. दुसरीकडं मुख्यमंत्रीसुद्धा डोळ्यात तेल घालून निर्णय घेताना दिसताहेत त्यामुळेच की काय मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत काही अधिकारी आणि सदस्यांच्या शिफारशीवरून घेतलेला निर्णय दोन दिवसात फिरवला. या निर्णयामुळं बिल्डरांना फायदा होईल आणि आपल्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील असं लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी निर्णयाला स्थगिती दिली. दरम्यान, सीएसटीवरील हिंसाचाराच्या घटनेनंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विशेष सलोखा निर्माण झाल्याची खमंग चर्चा सुरु आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी लावण्यावरून मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. याही निमित्तानं राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना चिमटा काढण्याची संधी राष्ट्रवादीनं सोडली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीतला हा कलगीतुरा निवडणुका येतील तसा अधिक रंगत जाणार, हेच खरं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2012 01:17 PM IST

राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

25 ऑक्टोबर

आज राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. एमएमआरडीएच्या जमिनीवरील इमारतींचा बांधकाम कालावधी वाढवण्याच्या निर्णयावरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. इमारतींचं बांधकाम 4 वर्षात पूर्ण करण्याची अट होती. पण बहुतेक इमारतींचं बांधकाम पूर्ण झालं नाही. त्यामुळे 2 दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवला आणि बिल्डर्सना फायदा पोहोचवण्यासाठी कालावधी 2 वर्षांनी वाढवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय बिल्डर धार्जिणा असून यात काळंबेरं आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

आधी राज्य सहकारी बँक आणि नंतर सिंचन श्वेतपत्रिकेचा मुद्दयावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी केली. त्यातच सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर छगन भुजबळ, सनिल तटकरे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधातील याचिका हायकोर्टात पोहोचल्या. एवढं सगळं झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांच्याविरोधातली नाराजी उफाळून येणं स्वाभावीक आहे. म्हणूनच आता राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एमएमआरडीएवर टीका केली. एमएमआरडीएच्या जमिनीवरील बांधकामाची कालमर्यादा आधी दोन वर्षांनी वाढवली आणि नंतर स्थगित का केली, असा सवाल राष्ट्रवादीने विचारलाय.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काही सापडतंय या याचा बारकाईनं अभ्यास करण्यात सध्या राष्ट्रवादीचे व्युहरचनाकार सध्या व्यस्त आहेत. दुसरीकडं मुख्यमंत्रीसुद्धा डोळ्यात तेल घालून निर्णय घेताना दिसताहेत त्यामुळेच की काय मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत काही अधिकारी आणि सदस्यांच्या शिफारशीवरून घेतलेला निर्णय दोन दिवसात फिरवला. या निर्णयामुळं बिल्डरांना फायदा होईल आणि आपल्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील असं लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी निर्णयाला स्थगिती दिली. दरम्यान, सीएसटीवरील हिंसाचाराच्या घटनेनंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विशेष सलोखा निर्माण झाल्याची खमंग चर्चा सुरु आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी लावण्यावरून मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.

याही निमित्तानं राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना चिमटा काढण्याची संधी राष्ट्रवादीनं सोडली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीतला हा कलगीतुरा निवडणुका येतील तसा अधिक रंगत जाणार, हेच खरं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2012 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close