S M L

पुण्यात MIT कॉलेजमध्ये रॅगिंग, विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

29 ऑक्टोबरपुण्यातल्या लोणी काळभोर इथल्या एमआयटी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका रॅगिंग पीडित विद्यार्थ्यांनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अमित कुमार शर्मा या बीएससी दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यानं गुरूवारी झोपेच्या गोळ्या आणि उंदीर मारण्याचं औषण खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेदरम्यान अमितनं एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यानं तिसर्‍या वर्षाच्या मरीन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंग झाल्याचा उल्लेख केला आहे. आपण उत्तर भारतीय असल्यानं आपल्याविरोधात रॅगिंग करत असल्याचं त्यांनं या पत्रात लिहिलं होतं. सुदैवानं अमितचा आत्महत्येचा प्रयत्न फसला आणि त्यातून तो वाचला. या प्रकरणी पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रकरणी अटक केली. सौरभ खरात, अक्षय डांभरे, सौरभ सावरे आणि नितीन मनोहर अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2012 03:07 PM IST

पुण्यात MIT कॉलेजमध्ये रॅगिंग, विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

29 ऑक्टोबर

पुण्यातल्या लोणी काळभोर इथल्या एमआयटी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका रॅगिंग पीडित विद्यार्थ्यांनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अमित कुमार शर्मा या बीएससी दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यानं गुरूवारी झोपेच्या गोळ्या आणि उंदीर मारण्याचं औषण खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेदरम्यान अमितनं एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यानं तिसर्‍या वर्षाच्या मरीन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंग झाल्याचा उल्लेख केला आहे. आपण उत्तर भारतीय असल्यानं आपल्याविरोधात रॅगिंग करत असल्याचं त्यांनं या पत्रात लिहिलं होतं. सुदैवानं अमितचा आत्महत्येचा प्रयत्न फसला आणि त्यातून तो वाचला. या प्रकरणी पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रकरणी अटक केली. सौरभ खरात, अक्षय डांभरे, सौरभ सावरे आणि नितीन मनोहर अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2012 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close