S M L

पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक मुख्य आरोपी अटकेत

27 ऑक्टोबरपुणे बॉम्बस्फोटाशी संबधित असलेला चौथा आणि मुख्य आरोपीपैंकी एक असलेला सय्यद मकबुल उर्फ सय्यद जुबेर याला दिल्ली एटीएसने ताब्यात घेतलंय. सय्यद मकबुल हा नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचा रहिवासी आहे. 1998 पासून तो नांदेड पोलिसांनाही हवा होता. याच सय्यद मकबुलने धर्माबादला बाजाराच्या ठिकाणी बॉम्बस्फोट केला होता. शारदा टॉकिजमध्ये 2000 साली बॉंम्बस्फोट घडवून आणल्यानंतर तो फरार झाला होता. आजम गौरी या अतिरेक्यासोबत तो गेल्या कित्येक वर्षापासून हैद्राबादला कार्यरत होता. एका पोलीस चकमकीत आजम गौरी मारला गेला आणि त्यानंतर आजम गौरीच्या संघटनेची जबाबदारी जुबेरनं घेतली. पुणे बॉम्बस्फोटामधला जुबेर हा मास्टरमाईंड मानला जातो. मराठवाड्यासह हैद्राबादमध्ये जुबेरचे मोठे नेटवर्क आहे ,ज्याचा तपास आता पोलीस घेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2012 10:13 AM IST

पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक मुख्य आरोपी अटकेत

27 ऑक्टोबर

पुणे बॉम्बस्फोटाशी संबधित असलेला चौथा आणि मुख्य आरोपीपैंकी एक असलेला सय्यद मकबुल उर्फ सय्यद जुबेर याला दिल्ली एटीएसने ताब्यात घेतलंय. सय्यद मकबुल हा नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचा रहिवासी आहे. 1998 पासून तो नांदेड पोलिसांनाही हवा होता. याच सय्यद मकबुलने धर्माबादला बाजाराच्या ठिकाणी बॉम्बस्फोट केला होता. शारदा टॉकिजमध्ये 2000 साली बॉंम्बस्फोट घडवून आणल्यानंतर तो फरार झाला होता. आजम गौरी या अतिरेक्यासोबत तो गेल्या कित्येक वर्षापासून हैद्राबादला कार्यरत होता. एका पोलीस चकमकीत आजम गौरी मारला गेला आणि त्यानंतर आजम गौरीच्या संघटनेची जबाबदारी जुबेरनं घेतली. पुणे बॉम्बस्फोटामधला जुबेर हा मास्टरमाईंड मानला जातो. मराठवाड्यासह हैद्राबादमध्ये जुबेरचे मोठे नेटवर्क आहे ,ज्याचा तपास आता पोलीस घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2012 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close