S M L

पबवर पोलिसांचा छापा ;150 तरूण हातावर तुरी देऊन फरार

27 ऑक्टोबरमुंबईत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पबवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 171 तरुण तरुणींना अटक करण्यात आली. वेळेची मर्यादा उलटून गेल्यानंतरही ही मुलं आणि मुली पबमध्ये होती. त्यामुळे रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी पबवर धाड टाकून या मुलांना अटक केली. पोलिसांच्या 10 ते 12 गाड्यांमधून या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. पण मेडिकल टेस्ट घेण्याची प्रकिया सुरू असताना या मुलांनी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला, आणि अपुर्‍या पोलीस बळामुळे यातली काही मुलं स्टेशनमधून फरार झाली. पोलीस आता हॉटेलमालकाचा शोध घेतायत. पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी ही माहिती दिली. कलम 110 नुसार या तरुण तरुणींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वेळ उलटून गेल्यानंतरही पब सुरु ठेवल्याप्रकरणी मालकावर कारवाई होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2012 11:27 AM IST

पबवर पोलिसांचा छापा ;150 तरूण हातावर तुरी देऊन फरार

27 ऑक्टोबर

मुंबईत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पबवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 171 तरुण तरुणींना अटक करण्यात आली. वेळेची मर्यादा उलटून गेल्यानंतरही ही मुलं आणि मुली पबमध्ये होती. त्यामुळे रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी पबवर धाड टाकून या मुलांना अटक केली. पोलिसांच्या 10 ते 12 गाड्यांमधून या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. पण मेडिकल टेस्ट घेण्याची प्रकिया सुरू असताना या मुलांनी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला, आणि अपुर्‍या पोलीस बळामुळे यातली काही मुलं स्टेशनमधून फरार झाली. पोलीस आता हॉटेलमालकाचा शोध घेतायत. पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी ही माहिती दिली. कलम 110 नुसार या तरुण तरुणींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वेळ उलटून गेल्यानंतरही पब सुरु ठेवल्याप्रकरणी मालकावर कारवाई होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2012 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close