S M L

आरोपानंतर गडकरींच्या कंपन्यांचे 'नामकरण' सुरू

29 ऑक्टोबरभाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती समूहातले नवनवीन घोटाळे पुढे येत आहेत. पूर्तीमधल्या गैरव्यवहारांच्या आरोपानंतर पूर्तीत गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांचे खोटे पत्ते बदलण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत मुंबई आणि ठाण्यातल्या 12 कंपन्यांचे पत्ते बदलले आहे. मागच्या आठवड्यात मुंबईतील झोपडपट्टीत दिलेले पत्ते बदलले असून नव्या ठिकाणी कंपनींच्या नावांच्या पाट्याही तात्काळ लावण्यात आल्या आहेत. एवढेच नाहीतर कंपनींच्या संचालकांच्या नावातही बदल करण्यात आले आहे. या कंपन्यांचं काम सुरू असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या सर्वांमधून केला जातोय.या कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेब साईटवर नवे पत्ते देण्यात आले आहे. मागिल आठवड्यात गडकरींच्या ड्रायव्हरपासून ते अकाउंटट संचालकपदी असल्याचं उघड झालं होतं.गडकरींच्या पूर्तीत संघाचा स्वयंसेवक डायरेक्टरभाजप आणि आरएसएस हे दोघेही नितीन गडकरींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. पण आम्ही केलेल्या तपासात एक नवी माहिती समोर आलीय. नितीन गडकरींच्या पूर्तीमध्ये आरएसएसच्या स्वयंसेवकांचा संबंध असल्याचं पुढं आलंय. आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार आएसएसमध्ये काम करणारे स्वयंसेवक गडकरींच्या कंपनीत डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. आएसएसचे स्वयंसेवक पूर्ती शुगर आणि पॉवरचे संस्थापक सदस्य असल्याचं समोर आलंय. पूर्तीचे प्रवर्तक असलेल्या जयकुमार वर्मा यांनी आपले आरएसएससोबत घनिष्ट संबंध असल्याचं मान्य केलंय. दरम्यान, नितीन गडकरी यांच्या पूर्ती कंपनीचे आरएसएससोबत थेट संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2012 05:27 PM IST

आरोपानंतर गडकरींच्या कंपन्यांचे 'नामकरण' सुरू

29 ऑक्टोबर

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती समूहातले नवनवीन घोटाळे पुढे येत आहेत. पूर्तीमधल्या गैरव्यवहारांच्या आरोपानंतर पूर्तीत गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांचे खोटे पत्ते बदलण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत मुंबई आणि ठाण्यातल्या 12 कंपन्यांचे पत्ते बदलले आहे. मागच्या आठवड्यात मुंबईतील झोपडपट्टीत दिलेले पत्ते बदलले असून नव्या ठिकाणी कंपनींच्या नावांच्या पाट्याही तात्काळ लावण्यात आल्या आहेत. एवढेच नाहीतर कंपनींच्या संचालकांच्या नावातही बदल करण्यात आले आहे. या कंपन्यांचं काम सुरू असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या सर्वांमधून केला जातोय.या कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेब साईटवर नवे पत्ते देण्यात आले आहे. मागिल आठवड्यात गडकरींच्या ड्रायव्हरपासून ते अकाउंटट संचालकपदी असल्याचं उघड झालं होतं.

गडकरींच्या पूर्तीत संघाचा स्वयंसेवक डायरेक्टर

भाजप आणि आरएसएस हे दोघेही नितीन गडकरींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. पण आम्ही केलेल्या तपासात एक नवी माहिती समोर आलीय. नितीन गडकरींच्या पूर्तीमध्ये आरएसएसच्या स्वयंसेवकांचा संबंध असल्याचं पुढं आलंय. आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार आएसएसमध्ये काम करणारे स्वयंसेवक गडकरींच्या कंपनीत डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. आएसएसचे स्वयंसेवक पूर्ती शुगर आणि पॉवरचे संस्थापक सदस्य असल्याचं समोर आलंय. पूर्तीचे प्रवर्तक असलेल्या जयकुमार वर्मा यांनी आपले आरएसएससोबत घनिष्ट संबंध असल्याचं मान्य केलंय. दरम्यान, नितीन गडकरी यांच्या पूर्ती कंपनीचे आरएसएससोबत थेट संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2012 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close