S M L

मंत्रिमंडळाच्या 'रंगसफेदी'नंतर रुसवे-फुगवे सुरू

29 ऑक्टोबरकेंद्रीय मंत्रिमंडळात काल मोठे फेरबदल करण्यात आले. 17 नवीन मंत्र्यांसह 22 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांनी आज आपला कार्यभार सांभाळला. पण फेरबदलांच्या दुसर्‍याच दिवशी काही मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली. जयपाल रेड्डी यांचं पेट्रोलिम मंत्रालय गेल्यामुळे ते फारच दुखावले गेलेत. त्यांचं पेट्रोलियम खातं वीरप्पा मोईली यांना देण्यात आलंय. आज सकाळी वीरप्पा मोईलींनी पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार स्वीकारला तेव्हा रेड्डी उपस्थित नव्हते. पण त्यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि आपण नाराज नाही, असं स्पष्टीकरण दिलं. खातं बदलल्यामुळे नाराज असलेले आणखी एक मंत्री म्हणजे कपिल सिब्बल. मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेतल्यानं ते नाराज आहेत. त्यांच्याकडे आता माहिती तंत्रज्ञान या एकाच मंत्रालयाची जबाबदारी आहे. सार्वजनिक स्वच्छता या विभागात जयराम रमेश यांनी गेल्या काही महिन्यात भरपूर काम केलं. पण त्यावरून वादही झाला होता. अखेर रमेश यांच्याकडूनही हे खातं काढून घेण्यात आलं. त्यामुळे ते ही नाराज आहेत. त्याचबरोबर सांख्यिकी राज्यमंत्री श्रीकांत जेना यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं ते नाराज आहेत. गेल्यावेळी मंत्रीपद हुकल्यानं त्यांनी सांख्यिकी राज्यमंत्री पदाची शपथ घ्यायला नकार दिला होता. पण पंतप्रधानांनी त्यांना पुढच्या वेळी कॅबिनेटमध्ये घेण्याचं आश्वासन दिलं होतं. पण यावेळीसुद्धा त्यांची निराशा झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2012 05:35 PM IST

मंत्रिमंडळाच्या 'रंगसफेदी'नंतर रुसवे-फुगवे सुरू

29 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळात काल मोठे फेरबदल करण्यात आले. 17 नवीन मंत्र्यांसह 22 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांनी आज आपला कार्यभार सांभाळला. पण फेरबदलांच्या दुसर्‍याच दिवशी काही मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली. जयपाल रेड्डी यांचं पेट्रोलिम मंत्रालय गेल्यामुळे ते फारच दुखावले गेलेत. त्यांचं पेट्रोलियम खातं वीरप्पा मोईली यांना देण्यात आलंय. आज सकाळी वीरप्पा मोईलींनी पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार स्वीकारला तेव्हा रेड्डी उपस्थित नव्हते. पण त्यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि आपण नाराज नाही, असं स्पष्टीकरण दिलं. खातं बदलल्यामुळे नाराज असलेले आणखी एक मंत्री म्हणजे कपिल सिब्बल. मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेतल्यानं ते नाराज आहेत. त्यांच्याकडे आता माहिती तंत्रज्ञान या एकाच मंत्रालयाची जबाबदारी आहे. सार्वजनिक स्वच्छता या विभागात जयराम रमेश यांनी गेल्या काही महिन्यात भरपूर काम केलं. पण त्यावरून वादही झाला होता. अखेर रमेश यांच्याकडूनही हे खातं काढून घेण्यात आलं. त्यामुळे ते ही नाराज आहेत. त्याचबरोबर सांख्यिकी राज्यमंत्री श्रीकांत जेना यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं ते नाराज आहेत. गेल्यावेळी मंत्रीपद हुकल्यानं त्यांनी सांख्यिकी राज्यमंत्री पदाची शपथ घ्यायला नकार दिला होता. पण पंतप्रधानांनी त्यांना पुढच्या वेळी कॅबिनेटमध्ये घेण्याचं आश्वासन दिलं होतं. पण यावेळीसुद्धा त्यांची निराशा झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2012 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close