S M L

ऐन दिवाळीच्या तोंडावर सरकारकडून कापूस खरेदी नाही

31 ऑक्टोबरदिवाळी तोंडावर आली असताना विदर्भात नगदी पीक असलेल्या कापसाची खरेदी सरकारनं अद्याप सुरू केली नाही. त्यामुळं शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना कापूस विकावा लागतो. सरकारनं कापूस खरेदी सुरू न केल्यानं व्यापारी शेतकर्‍यांना कमी भाव देतात. त्यामुळं सरकारनं कापसाला 5 हजार भाव द्यावा आणि तातडीनं खरेदी सुरू करावी अशी मागणी शतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, यावर्षी नाफेड मार्फेत कापूस खरेदी करण्याचा सरकारचा विचार आहे. पण त्यासाठी पतपुरवढादार मिळत नाही. सरकारनं त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही दिलीय. या प्रक्रियेमुळं कापूस खरेदीसाठी विलंब होणार हे आता स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2012 10:13 AM IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर सरकारकडून कापूस खरेदी नाही

31 ऑक्टोबर

दिवाळी तोंडावर आली असताना विदर्भात नगदी पीक असलेल्या कापसाची खरेदी सरकारनं अद्याप सुरू केली नाही. त्यामुळं शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना कापूस विकावा लागतो. सरकारनं कापूस खरेदी सुरू न केल्यानं व्यापारी शेतकर्‍यांना कमी भाव देतात. त्यामुळं सरकारनं कापसाला 5 हजार भाव द्यावा आणि तातडीनं खरेदी सुरू करावी अशी मागणी शतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, यावर्षी नाफेड मार्फेत कापूस खरेदी करण्याचा सरकारचा विचार आहे. पण त्यासाठी पतपुरवढादार मिळत नाही. सरकारनं त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही दिलीय. या प्रक्रियेमुळं कापूस खरेदीसाठी विलंब होणार हे आता स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2012 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close