S M L

सिलिंडर 26 रूपयांनी महागला

01 नोव्हेंबर 2012ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईमध्ये आता 7 व्या सिलिंडरसाठी 26 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. आधीच वाढलेल्या महागाईच्या भडक्यात आता गॅसचाही भडका उडणार आहे. सातवे विना अनुदानित सिलिंडरमध्ये 26 रुपये 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने डिझेलमध्ये दरवाढ आणि घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मर्यादा घातली गेल्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं गेलं. चौहीबाजूने दरवाढीचा निषेध झाल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यात 9 सिलिंडर देण्याचा सुचना केली आणि त्यांचे पूर्ण अधिकार ज्या त्या राज्यावर सोपवून दिला. मात्र काल बुधवारी राज्यातील जनतेला गॅस सिलिंडरच्या सबसिडीबाबत दिलासा मिळालेला नाहीय. 3 सिलिंडर्सची सवलत सर्व ग्राहकांना द्यायची असेल तर राज्याच्या तिजोरीवर 2400 कोटींचा बोजा पडणार आहे, असं राष्ट्रवादीकडे असलेल्या अर्थखात्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगितलं आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांना किंवा पिवळ्या कार्डधारक ग्राहकांना सवलतीचे 3 सिलेंडर द्यावे, अशा प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होऊ शकतं असं वाटत होतं पण तो होऊ शकलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2012 09:53 AM IST

सिलिंडर 26 रूपयांनी महागला

01 नोव्हेंबर 2012

ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईमध्ये आता 7 व्या सिलिंडरसाठी 26 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. आधीच वाढलेल्या महागाईच्या भडक्यात आता गॅसचाही भडका उडणार आहे. सातवे विना अनुदानित सिलिंडरमध्ये 26 रुपये 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने डिझेलमध्ये दरवाढ आणि घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मर्यादा घातली गेल्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं गेलं.

चौहीबाजूने दरवाढीचा निषेध झाल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यात 9 सिलिंडर देण्याचा सुचना केली आणि त्यांचे पूर्ण अधिकार ज्या त्या राज्यावर सोपवून दिला. मात्र काल बुधवारी राज्यातील जनतेला गॅस सिलिंडरच्या सबसिडीबाबत दिलासा मिळालेला नाहीय. 3 सिलिंडर्सची सवलत सर्व ग्राहकांना द्यायची असेल तर राज्याच्या तिजोरीवर 2400 कोटींचा बोजा पडणार आहे, असं राष्ट्रवादीकडे असलेल्या अर्थखात्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगितलं आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांना किंवा पिवळ्या कार्डधारक ग्राहकांना सवलतीचे 3 सिलेंडर द्यावे, अशा प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होऊ शकतं असं वाटत होतं पण तो होऊ शकलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2012 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close