S M L

जायकवाडीत फक्त 45 दिवस तहान भागण्यापुरतंच पाणी

30 ऑक्टोबरसध्या जायकवाडीमध्ये असलेलं पाणी आणि भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेलं पाणी हे फक्त 45 दिवस पुरणार असल्याचं जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितलंय. भंडारदरा-निळवंडे धरणातून सोडलेल्या अडीच टीएमसी पाण्यापैकी जायकवाडीमध्ये फक्त 0.96 टीएमसी इतकं पाणी आलंय. हे पाणी आल्यानंतर जायकवाडीमध्ये 4.20 टक्के इतका जीवंत पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी केला तर ते पाणी 45 दिवसच पुरणार आहे. भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते त्यानुसार पाणी सोडल्यानंतर मात्र 210 किलोमीटरचं अंतर पार करताना कोरडं पडलेलं नदीपात्र आणि बेसुमार वाळू उपसा यामुळे पाणी पोहचण्यास उशीर झाला. अर्ध्यावरुनही अधीक पाणी या कोरड्या नदीपात्रात झिरपून गेले. आणि जायकवाडी धरणात फक्त 0.96 टीएमसी पाणी मिळालं. अडीएच टीएमसी पाणी जर मिळालं असतं तर जूनपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार होता पण आताची परिस्थिती पाहता पाण्याची परिस्थिती आणखी भंयकर होणार असल्याची चिन्ह आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2012 02:41 PM IST

जायकवाडीत फक्त 45 दिवस तहान भागण्यापुरतंच पाणी

30 ऑक्टोबर

सध्या जायकवाडीमध्ये असलेलं पाणी आणि भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेलं पाणी हे फक्त 45 दिवस पुरणार असल्याचं जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितलंय. भंडारदरा-निळवंडे धरणातून सोडलेल्या अडीच टीएमसी पाण्यापैकी जायकवाडीमध्ये फक्त 0.96 टीएमसी इतकं पाणी आलंय. हे पाणी आल्यानंतर जायकवाडीमध्ये 4.20 टक्के इतका जीवंत पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी केला तर ते पाणी 45 दिवसच पुरणार आहे. भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते त्यानुसार पाणी सोडल्यानंतर मात्र 210 किलोमीटरचं अंतर पार करताना कोरडं पडलेलं नदीपात्र आणि बेसुमार वाळू उपसा यामुळे पाणी पोहचण्यास उशीर झाला. अर्ध्यावरुनही अधीक पाणी या कोरड्या नदीपात्रात झिरपून गेले. आणि जायकवाडी धरणात फक्त 0.96 टीएमसी पाणी मिळालं. अडीएच टीएमसी पाणी जर मिळालं असतं तर जूनपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार होता पण आताची परिस्थिती पाहता पाण्याची परिस्थिती आणखी भंयकर होणार असल्याची चिन्ह आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2012 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close