S M L

राज ठाकरे 'मातोश्री'वर

01 नोव्हेंबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. 15 दिवसांतली ही त्यांची दुसरी भेट आहे. यापूर्वीही बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती. आज राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या. ही भेट तब्बल दोन तास चालली.आता मी थकलोय, शारीरिक दृष्ट्या कोसळलोय मी आजपर्यंत शिवसेना सांभाळली आणि तुम्हालाही सांभाळलं आता उद्धव, आदित्यला सांभाळा इमान राखा असं भावनिक आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात एका व्हिडिओव्दारे दिलं. आपल्या बाळासाहेबांच्या चिंतेपोटी अनेक शिवसैनिकांचे डोळे पाणावले. यावेळी दादरच्या पराभवाचे शल्य बाळासाहेबांनी बोलून दाखवले आणि मराठी माणसांनी तरी शिवसेनेच्या विरोधात उभे राहू नये एकत्र या आणि काँग्रेसला धूळ चार असं आवाहन राज यांचं नाव न घेता केलं होतं. दोनच दिवसानंतर राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठली आणि बाळासाहेबांची भेट घेतली होती. तब्बल पावने दोन तासही भेट चालली. या अगोदर उद्धव ठाकरे यांच्या अँजिओप्लासिटीच्या वेळी राज स्वत:हा हजर होते. तब्बल साडेतीन वर्षानंतर ठाकरे बंधूंची भेट अख्या महाराष्ट्रानं पाहिली. पण या भेटीला भावनेची झालर होती. उद्धव हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर बाळासाहेबांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले होते. आज पुन्हा एकदा राज मातोश्रीवर दाखल झाले आहे. बाळासाहेब राज यांच्या भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2012 03:56 PM IST

राज ठाकरे 'मातोश्री'वर

01 नोव्हेंबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. 15 दिवसांतली ही त्यांची दुसरी भेट आहे. यापूर्वीही बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती. आज राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या. ही भेट तब्बल दोन तास चालली.

आता मी थकलोय, शारीरिक दृष्ट्या कोसळलोय मी आजपर्यंत शिवसेना सांभाळली आणि तुम्हालाही सांभाळलं आता उद्धव, आदित्यला सांभाळा इमान राखा असं भावनिक आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात एका व्हिडिओव्दारे दिलं. आपल्या बाळासाहेबांच्या चिंतेपोटी अनेक शिवसैनिकांचे डोळे पाणावले. यावेळी दादरच्या पराभवाचे शल्य बाळासाहेबांनी बोलून दाखवले आणि मराठी माणसांनी तरी शिवसेनेच्या विरोधात उभे राहू नये एकत्र या आणि काँग्रेसला धूळ चार असं आवाहन राज यांचं नाव न घेता केलं होतं. दोनच दिवसानंतर राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठली आणि बाळासाहेबांची भेट घेतली होती. तब्बल पावने दोन तासही भेट चालली. या अगोदर उद्धव ठाकरे यांच्या अँजिओप्लासिटीच्या वेळी राज स्वत:हा हजर होते. तब्बल साडेतीन वर्षानंतर ठाकरे बंधूंची भेट अख्या महाराष्ट्रानं पाहिली. पण या भेटीला भावनेची झालर होती. उद्धव हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर बाळासाहेबांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले होते. आज पुन्हा एकदा राज मातोश्रीवर दाखल झाले आहे. बाळासाहेब राज यांच्या भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2012 03:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close