S M L

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 16 तारखेपासून होणार सुरू

03 नोव्हेंबरकोल्हापूर मुंबई विमानसेवा येत्या 16 तारखेपासून सुरु होणार आहे. खराब धावपट्टी आणि सुविधांचा अभाव यामुळं गेले 6 महिने इथली विमानसेवा बंद होती. पण अखेर स्पाईस जेट कंपनीनं पुढाकार घेत येत्या 16 तारखेपासून विमानसेवा देण्याचं ठरवलं आहे. स्पाईस जेट या कंपनीनं क्यू 400 हे नवीन विमान वापरण्याचं ठरवलं असून 78 आसनक्षमतेचं हे विमान आहे. सुरुवातीला 3300 रुपये भाडं आकरण्यात येणार आहे. दरम्यान, या विमानसेवेमुळं कोल्हापुरमधल्या उद्योगाला पुन्हा एकदा चालना मिळण्याची शक्यता आहे. तसंच या सेवेनंतर बंगळूर, दिल्ली या ठिकाणीही कोल्हापुरमधून विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2012 11:41 AM IST

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 16 तारखेपासून होणार सुरू

03 नोव्हेंबर

कोल्हापूर मुंबई विमानसेवा येत्या 16 तारखेपासून सुरु होणार आहे. खराब धावपट्टी आणि सुविधांचा अभाव यामुळं गेले 6 महिने इथली विमानसेवा बंद होती. पण अखेर स्पाईस जेट कंपनीनं पुढाकार घेत येत्या 16 तारखेपासून विमानसेवा देण्याचं ठरवलं आहे. स्पाईस जेट या कंपनीनं क्यू 400 हे नवीन विमान वापरण्याचं ठरवलं असून 78 आसनक्षमतेचं हे विमान आहे. सुरुवातीला 3300 रुपये भाडं आकरण्यात येणार आहे. दरम्यान, या विमानसेवेमुळं कोल्हापुरमधल्या उद्योगाला पुन्हा एकदा चालना मिळण्याची शक्यता आहे. तसंच या सेवेनंतर बंगळूर, दिल्ली या ठिकाणीही कोल्हापुरमधून विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close