S M L

सीसीएसटी हिंसाचारप्रकरणी आयोजकांकडून लवकरच वसुली

03 नोव्हेंबरमुंबईत 11 ऑगस्ट रोजी झालेल्या जाळपोळी प्रकरणाबाबत सभेच्या आयोजकांकडून नुकसान भरपाईची वसुली करण्याबाबत पोलिसांनी आता हालचाली सुरु केली आहे. 11 ऑगस्टला आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली होती. यावेळी तीन ओबी व्हॅन्स, 3 पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 6 पोलीस जीप, 10-15 मोटारसायकल आणि काही खासगी गाड्या, माध्यमांच्या ओबी व्हॅन तसंच 50 बसेसची तोडफोड करण्यात आली होती. या हल्ल्यात 45 पोलिसांना मारहाणही करण्यात आली होती. तर इतर 30 ते 35 जण जखमी झाले होते. 11 ऑगस्टच्या या घटनेत झालेल्या नुकसानीबाबत पोलिसांनी सविस्तर निवेदन तयार केलंय. नुकसान भरपाई वसूल करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकार्‍यांना असतात. त्यामुळे वसुली करण्याबाबची सगळी कागदपत्र जिल्हाधिकार्‍यांना दिली गेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2012 02:26 PM IST

सीसीएसटी हिंसाचारप्रकरणी आयोजकांकडून लवकरच वसुली

03 नोव्हेंबर

मुंबईत 11 ऑगस्ट रोजी झालेल्या जाळपोळी प्रकरणाबाबत सभेच्या आयोजकांकडून नुकसान भरपाईची वसुली करण्याबाबत पोलिसांनी आता हालचाली सुरु केली आहे. 11 ऑगस्टला आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली होती. यावेळी तीन ओबी व्हॅन्स, 3 पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 6 पोलीस जीप, 10-15 मोटारसायकल आणि काही खासगी गाड्या, माध्यमांच्या ओबी व्हॅन तसंच 50 बसेसची तोडफोड करण्यात आली होती. या हल्ल्यात 45 पोलिसांना मारहाणही करण्यात आली होती. तर इतर 30 ते 35 जण जखमी झाले होते. 11 ऑगस्टच्या या घटनेत झालेल्या नुकसानीबाबत पोलिसांनी सविस्तर निवेदन तयार केलंय. नुकसान भरपाई वसूल करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकार्‍यांना असतात. त्यामुळे वसुली करण्याबाबची सगळी कागदपत्र जिल्हाधिकार्‍यांना दिली गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2012 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close