S M L

राज्यभरात डेंग्यूमुळे 38 जणांचा मृत्यू

01 नोव्हेंबरराज्यात दिवसेंदिवस डेंग्यूचा फैलाव वाढत चाललं आहे. आत्तापर्यंत राज्यभरात डेंग्यूच्या तापानं 38 जण दगावले असून सुमारे एक हजार जणांना लागण झालीय. गेल्या वर्षी डेंग्यू तापामुळं 21 जण दगावले होते. त्या तुलनेत डेंग्यूचा उद्रेक वाढला असला तरी काळजीचं कारण नाही सरकारी यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागल्या असून नागरिकांनीही योग्य खबरदारी घ्यायची आवश्यकता आहे असं राज्याचे हिवताप- मलेरीया-जलजन्य रोग नियंत्रण विभागाचे सहसंचालक विठ्ठल खानंदे यांनी सांगितलं. एडीस डासापासून डेंग्यू रोगाचा फैलाव होतो. पाण्याचा साठा न करणं. घरातील कुंड्या- टायर्स- कुलर्स अशा दैनंदीन वापराच्या वस्तूंमधये पाणी साठवू नये असा सूचना प्रशासनातर्फे देण्यात येत असून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती खानंदे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2012 12:19 PM IST

राज्यभरात डेंग्यूमुळे 38 जणांचा मृत्यू

01 नोव्हेंबर

राज्यात दिवसेंदिवस डेंग्यूचा फैलाव वाढत चाललं आहे. आत्तापर्यंत राज्यभरात डेंग्यूच्या तापानं 38 जण दगावले असून सुमारे एक हजार जणांना लागण झालीय. गेल्या वर्षी डेंग्यू तापामुळं 21 जण दगावले होते. त्या तुलनेत डेंग्यूचा उद्रेक वाढला असला तरी काळजीचं कारण नाही सरकारी यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागल्या असून नागरिकांनीही योग्य खबरदारी घ्यायची आवश्यकता आहे असं राज्याचे हिवताप- मलेरीया-जलजन्य रोग नियंत्रण विभागाचे सहसंचालक विठ्ठल खानंदे यांनी सांगितलं. एडीस डासापासून डेंग्यू रोगाचा फैलाव होतो. पाण्याचा साठा न करणं. घरातील कुंड्या- टायर्स- कुलर्स अशा दैनंदीन वापराच्या वस्तूंमधये पाणी साठवू नये असा सूचना प्रशासनातर्फे देण्यात येत असून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती खानंदे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2012 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close