S M L

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

30 ऑक्टोबरअमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता अवघा आठवडा उरलाय. 6 नोव्हेंबर ही निवडणूक होतेय. बराक ओबामा आणि मिट रॉमनी यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे. 'YES WE CAN' असं म्हणत बराक ओबामा यांनी 2008 साली निवडणूक जिंकली आणि अमेरिकेच्या इतिहासात पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष झाला. आता चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ओबामा निवडणुकीला सामोरे जातायत आणि यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत रिपब्लिकन पक्षाचे मिट रोमनी...या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचा. मिट रोमनी यांची धोरणं भांडवलदार आणि उच्च मध्यम वर्गाच्या बाजूची आहेत. याउलट मध्यम वर्ग तरला तर अमेरिका तरेल, असं ओबामांचं म्हणणं आहे. त्याशिवाय युद्ध हासुद्धा अमेरिकेसाठी मोठा मुद्दा आहे. ओबामांपूर्वीचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिका युद्धाच्या खाईत लोटली गेली. अफगाणिस्तान, इराकवरच्या युद्धांमुळे अमेरिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आली. पण तरीही रिपब्लिकन पक्षाचे सध्याचे उमेदवार मिट रोमनी हे युद्धाच्या बाजूनंच मत मांडतात. आपण निवडणूक जिंकलो तर गरज पडली तर इराणवर हल्ला चढवू, सैन्य शक्ती वाढवू, त्यांच्यावरचा खर्च वाढवू, अशी वक्तव्यं ते करतायत. याउलट ओबामा मात्र वाटाघाटीची, शांततेची भाषा बोलतात.या निवडणुकीतला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आरोग्याचा... गर्भपाताचा अधिकार महिलांना असावा की नाही, यावर अमेरिकेत वाद रंगलाय. परंपरावादी विचारांचे मिट रोमनी हा अधिकार महिलांना असू नये, या विचारांचे आहेत, तर ओबामा मात्र यावर उदारमतवादी भूमिका घेत आहे. त्यामुळे अर्थातच महिला मतदारांचा कल हा ओबामांकडे जास्त आहे.गे विवाहाबाबतही ओबामा यांनी उदारमतवादी भूमिका घेतलीय. पण रिपब्लिकनांचा गे मॅरेजेसला कडाडून विरोध आहे. अमेरिकेत 6 नोव्हेंबरला मतदान असलं तरी तिथे मतदानाची प्रक्रिया खूप आधीपासून सुरू होते. राष्ट्राध्यक्ष ओबामांनीही शिकागोत जाऊन आधीच मतदान केलं. वेगवेगळ्या संस्थांच्या सर्वेक्षणानुसार, मिट रोमनी विरुद्ध ओबामा या स्पर्धेत ओबामा आघाडीवर दिसताहेत. पण ओबामा आणि रोमनी यांच्यात शेवटपर्यंत चुरस राहील, असं तज्ञांचं मत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2012 05:13 PM IST

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

30 ऑक्टोबर

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता अवघा आठवडा उरलाय. 6 नोव्हेंबर ही निवडणूक होतेय. बराक ओबामा आणि मिट रॉमनी यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे. 'YES WE CAN' असं म्हणत बराक ओबामा यांनी 2008 साली निवडणूक जिंकली आणि अमेरिकेच्या इतिहासात पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष झाला. आता चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ओबामा निवडणुकीला सामोरे जातायत आणि यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत रिपब्लिकन पक्षाचे मिट रोमनी...

या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचा. मिट रोमनी यांची धोरणं भांडवलदार आणि उच्च मध्यम वर्गाच्या बाजूची आहेत. याउलट मध्यम वर्ग तरला तर अमेरिका तरेल, असं ओबामांचं म्हणणं आहे.

त्याशिवाय युद्ध हासुद्धा अमेरिकेसाठी मोठा मुद्दा आहे. ओबामांपूर्वीचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिका युद्धाच्या खाईत लोटली गेली. अफगाणिस्तान, इराकवरच्या युद्धांमुळे अमेरिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आली. पण तरीही रिपब्लिकन पक्षाचे सध्याचे उमेदवार मिट रोमनी हे युद्धाच्या बाजूनंच मत मांडतात. आपण निवडणूक जिंकलो तर गरज पडली तर इराणवर हल्ला चढवू, सैन्य शक्ती वाढवू, त्यांच्यावरचा खर्च वाढवू, अशी वक्तव्यं ते करतायत. याउलट ओबामा मात्र वाटाघाटीची, शांततेची भाषा बोलतात.

या निवडणुकीतला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आरोग्याचा... गर्भपाताचा अधिकार महिलांना असावा की नाही, यावर अमेरिकेत वाद रंगलाय. परंपरावादी विचारांचे मिट रोमनी हा अधिकार महिलांना असू नये, या विचारांचे आहेत, तर ओबामा मात्र यावर उदारमतवादी भूमिका घेत आहे. त्यामुळे अर्थातच महिला मतदारांचा कल हा ओबामांकडे जास्त आहे.

गे विवाहाबाबतही ओबामा यांनी उदारमतवादी भूमिका घेतलीय. पण रिपब्लिकनांचा गे मॅरेजेसला कडाडून विरोध आहे. अमेरिकेत 6 नोव्हेंबरला मतदान असलं तरी तिथे मतदानाची प्रक्रिया खूप आधीपासून सुरू होते. राष्ट्राध्यक्ष ओबामांनीही शिकागोत जाऊन आधीच मतदान केलं. वेगवेगळ्या संस्थांच्या सर्वेक्षणानुसार, मिट रोमनी विरुद्ध ओबामा या स्पर्धेत ओबामा आघाडीवर दिसताहेत. पण ओबामा आणि रोमनी यांच्यात शेवटपर्यंत चुरस राहील, असं तज्ञांचं मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2012 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close