S M L

ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी नुरीयाला 5 वर्षांचा तुरुंगवास

01 नोव्हेंबरदारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणार्‍या नुरीया हवेलीवाला हिला सत्र न्यायालयाने 5 लाखांचा दंड आणि 5 वर्षांचा तुरुंगवासाठी शिक्षा ठोठावली आहे. एनआरआय ब्युटीशियन नुरीया हवेलीवाला हिने 2010 साली मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं बेदरकारपणे कार चालवून पाच जणांना उडवलं होतं. त्यात एका पोलिसासह दोघांचा मृत्यू झाला होता. नुरीया हिने ड्रग्ज आणि दारूच्या नशेत असल्याचं वैद्यकीय तपासातून स्पष्ट झालं होतं. जानेवारी 2010 मध्ये नुरीया हिने दारूच्या नशेत सुसाट गाडी चालवत मरीन ड्राईव्ह परिसरात गाठला. आणि तिने पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी लावलेली असलेल्या भागात प्रवेश केला. सुरुवातीला तिने टॅक्सीला धडक दिली. त्यानंतर तिने 5 पोलीस हवालदार आणि पादचार्‍यांना उडवलं. तिची गाडी एवढ्यावर थांबली नाही पुढे जाऊन ती पोलिसांच्या जीववर जाऊन आदळली आणि त्यानंतर काही अंतर दूर गेल्यावर तिची कार पलटी झाली. याप्रकरणी तिला पोलिसांनी योग्यवेळी आरोपपत्र दाखल न केल्यामुळे जामीन मिळाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2012 12:43 PM IST

ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी नुरीयाला 5 वर्षांचा तुरुंगवास

01 नोव्हेंबर

दारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणार्‍या नुरीया हवेलीवाला हिला सत्र न्यायालयाने 5 लाखांचा दंड आणि 5 वर्षांचा तुरुंगवासाठी शिक्षा ठोठावली आहे. एनआरआय ब्युटीशियन नुरीया हवेलीवाला हिने 2010 साली मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं बेदरकारपणे कार चालवून पाच जणांना उडवलं होतं. त्यात एका पोलिसासह दोघांचा मृत्यू झाला होता. नुरीया हिने ड्रग्ज आणि दारूच्या नशेत असल्याचं वैद्यकीय तपासातून स्पष्ट झालं होतं. जानेवारी 2010 मध्ये नुरीया हिने दारूच्या नशेत सुसाट गाडी चालवत मरीन ड्राईव्ह परिसरात गाठला. आणि तिने पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी लावलेली असलेल्या भागात प्रवेश केला. सुरुवातीला तिने टॅक्सीला धडक दिली. त्यानंतर तिने 5 पोलीस हवालदार आणि पादचार्‍यांना उडवलं. तिची गाडी एवढ्यावर थांबली नाही पुढे जाऊन ती पोलिसांच्या जीववर जाऊन आदळली आणि त्यानंतर काही अंतर दूर गेल्यावर तिची कार पलटी झाली. याप्रकरणी तिला पोलिसांनी योग्यवेळी आरोपपत्र दाखल न केल्यामुळे जामीन मिळाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2012 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close