S M L

'भारत-पाक क्रिकेट सामने उधळून लावा'

05 नोव्हेंबरपाकिस्तान नेहमी भारतात उच्छाद मांडत असतो. अशा वेळी त्यांचा विरोध करण्यापेक्षा त्यांच्यासोबत क्रिकेटचे सामने भरवले जात आहे. सरकारनं भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करावे नाहीतर लोकांनी जिथे सामने आहेत तिथं जाऊन सामने उधळावेत, असं आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना मधून केलं.आपण आजारी असल्यानं अस्वस्थ आहोत, पण रक्त स्वस्थ बसू देत नाही या शब्दात बाळासाहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झालं गेलं विसरुन जाऊया असं वक्तव्य करणार्‍या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही बाळासाहेबांनी जोरदार टीका केली. 'शिंदेसाहेब तुमच्यात थोडी जरी लाजलज्जा शिल्लक असेल तर हे निर्लज्ज वक्तव्य मागे घ्या.' भारताच्या भूमीवर पाकिस्तान नेहमीच उच्छाद मांडत असतो. अशावेळी त्यांना चिरडण्याचं राहिले बाजूला उलट त्यांच्याबरोबर क्रिकेट सामने खेळवले जात आहेत. सरकारनं भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करावे नाहीतर लोकांनी जिथे सामने आहेत तिथं जाऊन सामने उधळावेत, असं आवाहन बाळासाहेब ठाकरेंनी केलंय. मात्र बाळासाहेबांच्या आवाहनाला केंद्राने उत्तर दिलंय. पाकिस्तानच्या टीमला पूर्ण संरक्षण दिलं जाईल असं केंद्रीय गृहराज्यमंत्री आर.पी.सिंह यांनी स्पष्ट केलंय. तसंच खेळात राजकारण आणणं योग्य नाही असा टोलाही त्यांनी लगवाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2012 09:37 AM IST

'भारत-पाक क्रिकेट सामने उधळून लावा'

05 नोव्हेंबर

पाकिस्तान नेहमी भारतात उच्छाद मांडत असतो. अशा वेळी त्यांचा विरोध करण्यापेक्षा त्यांच्यासोबत क्रिकेटचे सामने भरवले जात आहे. सरकारनं भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करावे नाहीतर लोकांनी जिथे सामने आहेत तिथं जाऊन सामने उधळावेत, असं आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना मधून केलं.

आपण आजारी असल्यानं अस्वस्थ आहोत, पण रक्त स्वस्थ बसू देत नाही या शब्दात बाळासाहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झालं गेलं विसरुन जाऊया असं वक्तव्य करणार्‍या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही बाळासाहेबांनी जोरदार टीका केली. 'शिंदेसाहेब तुमच्यात थोडी जरी लाजलज्जा शिल्लक असेल तर हे निर्लज्ज वक्तव्य मागे घ्या.' भारताच्या भूमीवर पाकिस्तान नेहमीच उच्छाद मांडत असतो. अशावेळी त्यांना चिरडण्याचं राहिले बाजूला उलट त्यांच्याबरोबर क्रिकेट सामने खेळवले जात आहेत. सरकारनं भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करावे नाहीतर लोकांनी जिथे सामने आहेत तिथं जाऊन सामने उधळावेत, असं आवाहन बाळासाहेब ठाकरेंनी केलंय. मात्र बाळासाहेबांच्या आवाहनाला केंद्राने उत्तर दिलंय. पाकिस्तानच्या टीमला पूर्ण संरक्षण दिलं जाईल असं केंद्रीय गृहराज्यमंत्री आर.पी.सिंह यांनी स्पष्ट केलंय. तसंच खेळात राजकारण आणणं योग्य नाही असा टोलाही त्यांनी लगवाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2012 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close