S M L

पुण्याच्या जुन्या हद्दीचा वाद मिटता मिटेना

02 नोव्हेंबरपुण्याच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखडा येत्या 5 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला येणार आहे. मात्र या आाराखड्यावरुन सुरु असलेला वाद अजुनही मिटला नाही. शहरातील जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप करत भाजपने या आराखड्याला विरोध करणार असल्याचं जाहीर केलंय. तर यातल्या अनेक मुद्द्यांना विरोध असून आराखडा मंजूर झाला पाहिजे पण या मुद्यांना वगळून अशी भुमिका विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांनी घेतली आहे. या विकास आराखड्याचा अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आराखडा लगेचच चर्चेला आणू नये अशी मागणी काँग्रेसने केली आहे. असं असलं तरी येत्या 5 तारखेला होणार्‍या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मांडला जाणारच. हा आराखडा चांगला आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी विरोधासाठी विरोध करु नये अशी भूमिका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2012 03:19 PM IST

पुण्याच्या जुन्या हद्दीचा वाद मिटता मिटेना

02 नोव्हेंबर

पुण्याच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखडा येत्या 5 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला येणार आहे. मात्र या आाराखड्यावरुन सुरु असलेला वाद अजुनही मिटला नाही. शहरातील जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप करत भाजपने या आराखड्याला विरोध करणार असल्याचं जाहीर केलंय. तर यातल्या अनेक मुद्द्यांना विरोध असून आराखडा मंजूर झाला पाहिजे पण या मुद्यांना वगळून अशी भुमिका विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांनी घेतली आहे. या विकास आराखड्याचा अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आराखडा लगेचच चर्चेला आणू नये अशी मागणी काँग्रेसने केली आहे. असं असलं तरी येत्या 5 तारखेला होणार्‍या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मांडला जाणारच. हा आराखडा चांगला आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी विरोधासाठी विरोध करु नये अशी भूमिका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2012 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close