S M L

'बेस्ट'च्या कर्मचार्‍यांना बोनस दूरच, पगारही हातात नाही !

06 नोव्हेंबरऐन दिवाळीच्या तोंडावर बेस्ट कर्मचार्‍यांवर काळोखाचे ढग जमा झाले आहे. बेस्टच्या 46 हजार कर्मचार्‍यांना गेल्या महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाही. 6 नोव्हेंबर उलटूनही बेस्ट कर्मचार्‍यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांना पगार द्यायला पैसे नाहीत तर बोनस कसा देणार याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. पगार देता यावा याची तरतूद आधी करुन मगच बोनस कसा देता येईल याचा विचार करु असं बेस्टचे जनरल मॅनेजर ओ. पी. गुप्ता यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. गेल्याच आठवड्यात बेस्टनं महापालिकेकडून 1600 कोटीचं कर्ज घेतलं आहे. त्यामुळे अगोदर कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या बेस्टपुढे कर्मचार्‍यांना बोनस तर दूरच पगार देण्यासाठी हात आखडता घेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2012 01:18 PM IST

'बेस्ट'च्या कर्मचार्‍यांना बोनस दूरच, पगारही हातात नाही !

06 नोव्हेंबर

ऐन दिवाळीच्या तोंडावर बेस्ट कर्मचार्‍यांवर काळोखाचे ढग जमा झाले आहे. बेस्टच्या 46 हजार कर्मचार्‍यांना गेल्या महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाही. 6 नोव्हेंबर उलटूनही बेस्ट कर्मचार्‍यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांना पगार द्यायला पैसे नाहीत तर बोनस कसा देणार याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. पगार देता यावा याची तरतूद आधी करुन मगच बोनस कसा देता येईल याचा विचार करु असं बेस्टचे जनरल मॅनेजर ओ. पी. गुप्ता यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. गेल्याच आठवड्यात बेस्टनं महापालिकेकडून 1600 कोटीचं कर्ज घेतलं आहे. त्यामुळे अगोदर कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या बेस्टपुढे कर्मचार्‍यांना बोनस तर दूरच पगार देण्यासाठी हात आखडता घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2012 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close