S M L

औरंगाबादमध्ये डेंग्यूचा आणखी एक बळी

06 नोव्हेंबरऔरंगाबादमध्ये डेंग्यूनं आणखी एकाचा बळी घेतला आहे. तर शहरातील वेगवेगळया हॉस्पिटलमध्ये दीडशेहुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या महिनाभरापासून शहर आणि परिसरामध्ये डेंग्यूची साथ फैलावत आहे. याच दरम्यान, महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वतीनं तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये कोणत्याही उपाययोजना अमालात आली नसल्यानं डेग्यू आटोक्यात येणं अवघड झालंय. दिवसेंदिवस डेग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. उपाययोजना म्हणून पाळण्यात येणारा कोरडा दिवस आणि धूर फवारणीही केली नसल्यानंही समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2012 02:24 PM IST

औरंगाबादमध्ये डेंग्यूचा आणखी एक बळी

06 नोव्हेंबर

औरंगाबादमध्ये डेंग्यूनं आणखी एकाचा बळी घेतला आहे. तर शहरातील वेगवेगळया हॉस्पिटलमध्ये दीडशेहुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या महिनाभरापासून शहर आणि परिसरामध्ये डेंग्यूची साथ फैलावत आहे. याच दरम्यान, महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वतीनं तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये कोणत्याही उपाययोजना अमालात आली नसल्यानं डेग्यू आटोक्यात येणं अवघड झालंय. दिवसेंदिवस डेग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. उपाययोजना म्हणून पाळण्यात येणारा कोरडा दिवस आणि धूर फवारणीही केली नसल्यानंही समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2012 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close