S M L

काँग्रेसची मान्यता रद्द करण्याची स्वामींची याचिका फेटाळली

06 नोव्हेंबरकाँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळून लावली आहे. काँग्रेस पक्षानं नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राला 90 कोटींचं कर्ज दिलं होतं. पण कुठलाही राजकीय पक्ष अशाप्रकारे कर्ज देऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसची मान्यता रद्द करावी, अशी याचिका जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं असेल तरच आयोग कारवाई करू शकतं. पण स्वामी ते सिद्ध करू शकले नाही असं आयोगानं म्हटलंय. यावर स्वामींनी तीव्र प्रतिक्रिया दिली. याचिका फेटाळण्याआधी आयोगानं सुनावणी घ्यायला हवी होती. आता आपण कोर्टात जाऊ असं स्वामींनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2012 02:27 PM IST

काँग्रेसची मान्यता रद्द करण्याची स्वामींची याचिका फेटाळली

06 नोव्हेंबर

काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळून लावली आहे. काँग्रेस पक्षानं नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राला 90 कोटींचं कर्ज दिलं होतं. पण कुठलाही राजकीय पक्ष अशाप्रकारे कर्ज देऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसची मान्यता रद्द करावी, अशी याचिका जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं असेल तरच आयोग कारवाई करू शकतं. पण स्वामी ते सिद्ध करू शकले नाही असं आयोगानं म्हटलंय. यावर स्वामींनी तीव्र प्रतिक्रिया दिली. याचिका फेटाळण्याआधी आयोगानं सुनावणी घ्यायला हवी होती. आता आपण कोर्टात जाऊ असं स्वामींनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2012 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close