S M L

शेतकर्‍यांना दिवाळी भेट, 11 नोव्हेंबरपासून कापूस खरेदी

06 नोव्हेंबरकापूस उत्पादकांना सरकारने दिवाळीची खास भेट दिली आहे. येत्या 11 नोव्हेंबरपासून राज्य सरकार कापूस खरेदी करणार आहे. केंद्र सरकारनं यंदा कापसाला 3 हजार 900 प्रती क्विंटल इतकी आधारभूत किंमत जाहीर केली आहे. तीच किंमत पणन महासंघाकडून शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. 109 केंद्रांवर ही कापूस खरेदी होणार आहे. गेल्या दोन हंगामात राज्य सरकारनं शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी केला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकार कापूस खरेदी करणार आहे ही त्यातल्या त्यात शेतकर्‍यांना दिलासा देणारी बाब आहे. 11 नोव्हेंबरला वर्ध्यात पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2012 02:45 PM IST

शेतकर्‍यांना दिवाळी भेट, 11 नोव्हेंबरपासून कापूस खरेदी

06 नोव्हेंबर

कापूस उत्पादकांना सरकारने दिवाळीची खास भेट दिली आहे. येत्या 11 नोव्हेंबरपासून राज्य सरकार कापूस खरेदी करणार आहे. केंद्र सरकारनं यंदा कापसाला 3 हजार 900 प्रती क्विंटल इतकी आधारभूत किंमत जाहीर केली आहे. तीच किंमत पणन महासंघाकडून शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. 109 केंद्रांवर ही कापूस खरेदी होणार आहे. गेल्या दोन हंगामात राज्य सरकारनं शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी केला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकार कापूस खरेदी करणार आहे ही त्यातल्या त्यात शेतकर्‍यांना दिलासा देणारी बाब आहे. 11 नोव्हेंबरला वर्ध्यात पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2012 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close