S M L

कोल्हापूरमध्ये खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचं कामबंद आंदोलन

05 नोव्हेंबरकोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांमध्ये आजपासून वकिलांनी कामबंद आंदोलन सुरु केलंय. सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातले वकील या आंदोलनात सहभागी झालेत. या आंदोलनामुळे 6 जिल्ह्यातलं न्यायालयीन कामकाज संपूर्णपणे ठप्प झालंय. वकिलांच्या या आंदोलनाला अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनींही पाठिंबा दिलाय. हे आंदोलन 3 दिवस चालणार असून 3 दिवसांत निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2012 01:03 PM IST

05 नोव्हेंबर

कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांमध्ये आजपासून वकिलांनी कामबंद आंदोलन सुरु केलंय. सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातले वकील या आंदोलनात सहभागी झालेत. या आंदोलनामुळे 6 जिल्ह्यातलं न्यायालयीन कामकाज संपूर्णपणे ठप्प झालंय. वकिलांच्या या आंदोलनाला अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनींही पाठिंबा दिलाय. हे आंदोलन 3 दिवस चालणार असून 3 दिवसांत निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2012 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close