S M L

बराक ओबामा पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष

07 नोव्हेंबरअमेरिकेच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा बराक ओबामा यांनी बाजी मारली आहे. ओबामांनी मिट रोम्नी यांना व्हाईट हाऊसच्या शर्यतीत धोबीपछाड दिला आहे. ओबामा यांना 303 मत मिळाली तर रोम्नी यांना 206 मत मिळाली आहे. सुरुवातीला ही लढत अत्यंत अटीतटीची होईलं असं मानल्या जातं होतं. पण ओबामांनी बहुमताचा आकडा पार करत विजय मिळवला आहे. ओबामांच्या विजयानंतर अमेरिकेत नागरिक एकच जल्लोष करत आहे. बराक ओबामा सलग दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतायत.अतिशय चुरशीच्या झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या ओबामांनी रिपब्लिकन पक्षाच्या मिट रोमनींचा पराभव केला आणि ओव्हल ऑफिसची सूत्रं नव्यानं स्वीकारण्यासाठी सज्ज झाले. विजयानंतर शिकागोमध्ये समर्थकांचे आभार मानण्यासाठी हजारो समर्थकांपुढे ओबामा आपली पत्नी मिशेल आणि दोन मुलींसह दाखल झाले आणि अतिशय प्रेरणादायी भाषण केलं.पण, ओबामांसाठी दुसर्‍यांदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल होण्याची ही लढाई सोपी नव्हती. मिट रोमनींनी त्यांना शर्थीची टक्कर दिली. ओबामांना 49.8 टक्के तर रोमनी यांना 48.6 टक्के पॉप्युलर व्होट्स मिळाले. ओहिओ, विस्कॉन्सिन, आयोवा, व्हर्जिनिया, न्यू हॅम्पशायर, कोलोरॅडो आणि नेवाडा या राज्यांमध्ये ओबामांनी घसघशीत विजय मिळवला. 2008 प्रमाणेच तरुणांनी, महिलांनी आणि अल्पसंख्याक मतदारांनी ओबामांना पसंती दिली.दुसरीकडे बोस्टनमध्ये आपल्या निराश चाहत्यांच्या समोर मिट रोमनीनी एक छोटसं भाषण केलं. आपला पराभव खिलाडूवृत्तीनं मान्य करत त्यांनी ओबामांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमोरच्या आव्हानांची जाणीव करून देत लोकांनाही ओबामांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं.परिवर्तनाचा नारा देत 2008 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती विराजमान होण्याची ऐतिहासिक कामगिरी ओबामांनी केली होती. आता अमेरिकेची अर्थव्यवस्था सुदृढ करण्याचं मोठं आव्हान ओबामांना पेलायचं आहे. अमेरिकन लोकांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास व्यक्त केलाय.आणि ओबामांनीनीही पुन्हा एकदा त्यांना स्वप्न दाखवलंय..द बेस्ट इज यट टू कम...!कोणत्या राज्यात किती मतं पडली ते पाहूया...?कॅलिफोर्निया ओबामा - 56%रोमनी - 41%डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाओबामा - 91%रोमनी - 7%फ्लोरिडा ओबामा - 48% रोमनी - 48%आयोवाओबामा - 52%रोमनी - 47%मॅसॅच्युसेट्स ओबामा - 60%रोमनी - 38%नेवाडाओबामा - 53%रोमनी - 46%न्यू जर्सी ओबामा - 58%रोमनी - 41%न्यू मेक्सिकोओबामा - 53%रोमनी - 43%न्यूयॉर्कओबामा - 60%रोमनी - 38%ओहिओ ओबामा - 50%रोमनी - 48%व्हर्जिनियाओबामा - 50%रोमनी - 49%वॉशिंग्टनओबामा - 55%रोमनी - 43%ओबामा आणि मिट रोमनींना कुणी पसंती दिली ते पाहूयापुरुष ओबामा - 45%रोमनी - 52%महिला ओबामा - 55%रोमनी - 43%18-29 वर्षं वयोगटओबामा - 60%रोमनी - 36%30-44 वर्षं वयोगट ओबामा - 52%रोमनी - 45%45-64 वर्षं वयोगटओबामा - 48%रोमनी - 51%65 वर्षांच्या वरओबामा - 44%रोमनी - 55%शहरओबामा - 62%रोमनी - 36%उपनगरओबामा - 48%रोमनी - 50%ग्रामीण ओबामा - 40%रोमनी - 58%ओबामांच्या विजयाची कारणं 1 महिला, तरुण, अल्पसंख्याकांची ओबामांना पसंती 2 खतरनाक अतिरेकी ओसामा बिन लादेनचा खात्मा3 ऑटो इंडस्ट्रीला बेलआऊट पॅकेज दिल्यानं कामगारांची मतं मिळाली4 आर्थिक परिस्थिती सुधारली, रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या5 परराष्ट्र, महिला आणि अल्पसंख्याकाबाबत रोमनींच्या बेजबाबदार धोरणांचा ओबामांना फायदाओबामांच्या विजयाचं भारतासाठी काय महत्त्व आहे ?- भारत-अमेरिका संबंधांत सातत्य- दहशतवादाच्या मुद्द्यावर अधिक सहकार्य- पाकिस्तानविरोधात कडक धोरणाची शक्यता- भारतासोबत व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यावर भर

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2012 08:03 AM IST

बराक ओबामा पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष

07 नोव्हेंबरअमेरिकेच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा बराक ओबामा यांनी बाजी मारली आहे. ओबामांनी मिट रोम्नी यांना व्हाईट हाऊसच्या शर्यतीत धोबीपछाड दिला आहे. ओबामा यांना 303 मत मिळाली तर रोम्नी यांना 206 मत मिळाली आहे. सुरुवातीला ही लढत अत्यंत अटीतटीची होईलं असं मानल्या जातं होतं. पण ओबामांनी बहुमताचा आकडा पार करत विजय मिळवला आहे. ओबामांच्या विजयानंतर अमेरिकेत नागरिक एकच जल्लोष करत आहे.

बराक ओबामा सलग दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतायत.अतिशय चुरशीच्या झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या ओबामांनी रिपब्लिकन पक्षाच्या मिट रोमनींचा पराभव केला आणि ओव्हल ऑफिसची सूत्रं नव्यानं स्वीकारण्यासाठी सज्ज झाले. विजयानंतर शिकागोमध्ये समर्थकांचे आभार मानण्यासाठी हजारो समर्थकांपुढे ओबामा आपली पत्नी मिशेल आणि दोन मुलींसह दाखल झाले आणि अतिशय प्रेरणादायी भाषण केलं.

पण, ओबामांसाठी दुसर्‍यांदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल होण्याची ही लढाई सोपी नव्हती. मिट रोमनींनी त्यांना शर्थीची टक्कर दिली. ओबामांना 49.8 टक्के तर रोमनी यांना 48.6 टक्के पॉप्युलर व्होट्स मिळाले. ओहिओ, विस्कॉन्सिन, आयोवा, व्हर्जिनिया, न्यू हॅम्पशायर, कोलोरॅडो आणि नेवाडा या राज्यांमध्ये ओबामांनी घसघशीत विजय मिळवला. 2008 प्रमाणेच तरुणांनी, महिलांनी आणि अल्पसंख्याक मतदारांनी ओबामांना पसंती दिली.

दुसरीकडे बोस्टनमध्ये आपल्या निराश चाहत्यांच्या समोर मिट रोमनीनी एक छोटसं भाषण केलं. आपला पराभव खिलाडूवृत्तीनं मान्य करत त्यांनी ओबामांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमोरच्या आव्हानांची जाणीव करून देत लोकांनाही ओबामांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं.

परिवर्तनाचा नारा देत 2008 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती विराजमान होण्याची ऐतिहासिक कामगिरी ओबामांनी केली होती. आता अमेरिकेची अर्थव्यवस्था सुदृढ करण्याचं मोठं आव्हान ओबामांना पेलायचं आहे. अमेरिकन लोकांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास व्यक्त केलाय.आणि ओबामांनीनीही पुन्हा एकदा त्यांना स्वप्न दाखवलंय..द बेस्ट इज यट टू कम...!कोणत्या राज्यात किती मतं पडली ते पाहूया...?कॅलिफोर्निया ओबामा - 56%रोमनी - 41%

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाओबामा - 91%रोमनी - 7%फ्लोरिडा ओबामा - 48% रोमनी - 48%

आयोवाओबामा - 52%रोमनी - 47%

मॅसॅच्युसेट्स ओबामा - 60%रोमनी - 38%

नेवाडाओबामा - 53%रोमनी - 46%

न्यू जर्सी ओबामा - 58%रोमनी - 41%

न्यू मेक्सिकोओबामा - 53%रोमनी - 43%

न्यूयॉर्कओबामा - 60%रोमनी - 38%

ओहिओ ओबामा - 50%रोमनी - 48%

व्हर्जिनियाओबामा - 50%रोमनी - 49%वॉशिंग्टनओबामा - 55%रोमनी - 43%ओबामा आणि मिट रोमनींना कुणी पसंती दिली ते पाहूया

पुरुष ओबामा - 45%रोमनी - 52%

महिला ओबामा - 55%रोमनी - 43%

18-29 वर्षं वयोगटओबामा - 60%रोमनी - 36%

30-44 वर्षं वयोगट ओबामा - 52%रोमनी - 45%

45-64 वर्षं वयोगटओबामा - 48%रोमनी - 51%

65 वर्षांच्या वरओबामा - 44%रोमनी - 55%

शहरओबामा - 62%रोमनी - 36%

उपनगरओबामा - 48%रोमनी - 50%

ग्रामीण ओबामा - 40%रोमनी - 58%

ओबामांच्या विजयाची कारणं 1 महिला, तरुण, अल्पसंख्याकांची ओबामांना पसंती 2 खतरनाक अतिरेकी ओसामा बिन लादेनचा खात्मा3 ऑटो इंडस्ट्रीला बेलआऊट पॅकेज दिल्यानं कामगारांची मतं मिळाली4 आर्थिक परिस्थिती सुधारली, रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या5 परराष्ट्र, महिला आणि अल्पसंख्याकाबाबत रोमनींच्या बेजबाबदार धोरणांचा ओबामांना फायदाओबामांच्या विजयाचं भारतासाठी काय महत्त्व आहे ?- भारत-अमेरिका संबंधांत सातत्य- दहशतवादाच्या मुद्द्यावर अधिक सहकार्य- पाकिस्तानविरोधात कडक धोरणाची शक्यता- भारतासोबत व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यावर भर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2012 08:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close