S M L

अनुदानीत 9 सिलिंडरबाबत आज घोषणा होण्याची शक्यता

07 नोव्हेंबरअनुदानीत सिलेंडर गॅसची संख्या 6 वरून 9 वर नेण्याचा विषय बर्‍याच काळापासून प्रलंबित आहे. सरसकट सर्व ग्राहकांना तीन सिलिंडरची सबसिडी देऊ केल्यास राज्याच्या तिजोरीवरती मोठा बोजा पडेल असं राज्य सरकारला वाटत होतं. पण आता ऐन दिवाळीत राज्यसरकार तीन सिलिंडरची सबसिडी द्यायला राजी झालंय. त्यासाठी 1600 कोटी रुपयांचा बोजा सहन करायला अर्थखात्यानं तयारी दाखवल्याचं समजतंय त्यामुळंच आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅस सिलेंडरचा मुद्दा पुन्हा चर्चेला येणार आहे. हा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवाठा विभागाकडून मांडला जाण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट देतं का ते पहावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2012 10:11 AM IST

अनुदानीत 9 सिलिंडरबाबत आज घोषणा होण्याची शक्यता

07 नोव्हेंबर

अनुदानीत सिलेंडर गॅसची संख्या 6 वरून 9 वर नेण्याचा विषय बर्‍याच काळापासून प्रलंबित आहे. सरसकट सर्व ग्राहकांना तीन सिलिंडरची सबसिडी देऊ केल्यास राज्याच्या तिजोरीवरती मोठा बोजा पडेल असं राज्य सरकारला वाटत होतं. पण आता ऐन दिवाळीत राज्यसरकार तीन सिलिंडरची सबसिडी द्यायला राजी झालंय. त्यासाठी 1600 कोटी रुपयांचा बोजा सहन करायला अर्थखात्यानं तयारी दाखवल्याचं समजतंय त्यामुळंच आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅस सिलेंडरचा मुद्दा पुन्हा चर्चेला येणार आहे. हा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवाठा विभागाकडून मांडला जाण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट देतं का ते पहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2012 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close