S M L

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी;काँग्रेसला धक्का

05 नोव्हेंबरराज्यातल्या ठाणे, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल आज जाहीर झाला. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का देत वर्चस्व मिळवलंय. तर नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह नवापूर आणि तळोदा नगर परिषदेवर विजय संपादन करून राष्ट्रवादीच्या विजयकुमार गावित यांना काँग्रेसनं धोबीपछाड दिला आहे. डहाणूमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला दणका देत सत्ता काबीज केली आहे. तर जव्हारमध्ये शिवसेनेच्या गडाला हादरा देत राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. तिकडे नाशिकमध्ये मनसेला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली आहे. मात्र इगतपुरीत शिवसेनेनं सत्ता राखली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2012 04:33 PM IST

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी;काँग्रेसला धक्का

05 नोव्हेंबर

राज्यातल्या ठाणे, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल आज जाहीर झाला. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का देत वर्चस्व मिळवलंय. तर नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह नवापूर आणि तळोदा नगर परिषदेवर विजय संपादन करून राष्ट्रवादीच्या विजयकुमार गावित यांना काँग्रेसनं धोबीपछाड दिला आहे. डहाणूमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला दणका देत सत्ता काबीज केली आहे. तर जव्हारमध्ये शिवसेनेच्या गडाला हादरा देत राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. तिकडे नाशिकमध्ये मनसेला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली आहे. मात्र इगतपुरीत शिवसेनेनं सत्ता राखली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2012 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close