S M L

फौंड्री उद्योगाची बैठक शिवसैनिकांनी उधळली

08 नोव्हेंबरकोल्हापुरामधला फौंड्री उद्योग कर्नाटकात जाण्यास शिवसेनेनं कडाडून विरोध केला आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची आज कर्नाटक राज्यातल्या उद्योग सहसंचालक आणि अधिकार्‍यांशी बैठक होती. 8 दिवसांपूर्वी जिल्ह्यातल्या 25 फौंड्री उद्योजकांनी कर्नाटक राज्याच्या उद्योगमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतरची चर्चा आजच्या बैठकीत होणार होती. मात्र ही बैठक सुरू होताच त्याठिकाणी अचानक शिवसैनिक घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करत ही बैठकच बंद पाडली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे कोल्हापुरातल्या व्यापार्‍यांनी बैठकीतून पळ काढला. त्यानंतर शिवसैनिकांनी या अधिकार्‍यांना कार्यालयातून हाकलून लावलं. यावेळी काही शिवसैनिकांनी अधिकार्‍यांना धक्काबुकीही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2012 03:26 PM IST

फौंड्री उद्योगाची बैठक शिवसैनिकांनी उधळली

08 नोव्हेंबर

कोल्हापुरामधला फौंड्री उद्योग कर्नाटकात जाण्यास शिवसेनेनं कडाडून विरोध केला आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची आज कर्नाटक राज्यातल्या उद्योग सहसंचालक आणि अधिकार्‍यांशी बैठक होती. 8 दिवसांपूर्वी जिल्ह्यातल्या 25 फौंड्री उद्योजकांनी कर्नाटक राज्याच्या उद्योगमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतरची चर्चा आजच्या बैठकीत होणार होती. मात्र ही बैठक सुरू होताच त्याठिकाणी अचानक शिवसैनिक घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करत ही बैठकच बंद पाडली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे कोल्हापुरातल्या व्यापार्‍यांनी बैठकीतून पळ काढला. त्यानंतर शिवसैनिकांनी या अधिकार्‍यांना कार्यालयातून हाकलून लावलं. यावेळी काही शिवसैनिकांनी अधिकार्‍यांना धक्काबुकीही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2012 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close