S M L

प्रेयसीवर केमिकल हल्ला करणार्‍या प्रियकराला अटक

11 नोव्हेंबरमुंबईमध्ये वरळी येथे प्रेयसीवर रसायन हल्ला करणार्‍या प्रियकराला अखेर अटक करण्यात आली आहे. जेरीड जॉन असं या आरोपीचं नाव आहे. हल्ल्यानंतर जेरीड फरार होता. त्याला आज नालासोपार्‍यातल्या मंथन हॉटेलमधून पोलिसांनी अटक केलं. जेरीड जॉन याने आपली प्रेयसी आर्यांका होसपेठकर हिच्यावर रसायन फेकले होते. यामुळे तिच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. फेसबुकच्या माध्यमातून जॉन आणि आर्यांकाची ओळख झाली होती. एका हौशी सायकलींग ग्रुपमध्ये दोघे सदस्य होते. कालांतर या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण जॉनचे अगोदरच लग्न झालेलं होतं. त्याला पाच वर्षाचा मुलगा आहे. ही धक्कादायक माहिती आर्यांका कळताच तिने जॉनपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आर्यांका आपल्यापासून दूर जात असल्याचं जॉनला राहवलं गेलं नाही. वारंवार तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आर्यांका त्याला टाळू लागली. दोन दिवसांपुर्वीच आर्यांकाने नाते तोडण्यासाठी जॉनला आपल्या घरी बोलावून घेतले होते. यावेळी तिची आई, धाकटा भाऊ आणि जवळचे मित्र सोबत होते. यावेळी जॉन आणि आर्यांकामध्ये वाद झाला. त्यानंतर दुसर्‍यादिवशी पहाटे जॉन आर्यांकाच्या घरी गेला आणि तिच्यावर रसायन फेकून पसारा झाला. आर्यांकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी जॉनच्या घरातून रसायनाचे नमुने वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवले असून सदरील रसायन ऍसिड नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. पण नेमकं रसायन काय होतं हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. जॉन हा मुळचा केरळचा. त्याने अनेक सिनेमात संकलनाचं काम केलं. तसेच करिअरच्या सुरूवातीला तो व्ही चॅनेलमध्ये काम करत होता. यानंतर त्याने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस उभारले या हाऊसमधून त्याने शॉर्टफिल्म तयार केल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2012 02:04 PM IST

प्रेयसीवर केमिकल हल्ला करणार्‍या प्रियकराला अटक

11 नोव्हेंबर

मुंबईमध्ये वरळी येथे प्रेयसीवर रसायन हल्ला करणार्‍या प्रियकराला अखेर अटक करण्यात आली आहे. जेरीड जॉन असं या आरोपीचं नाव आहे. हल्ल्यानंतर जेरीड फरार होता. त्याला आज नालासोपार्‍यातल्या मंथन हॉटेलमधून पोलिसांनी अटक केलं.

जेरीड जॉन याने आपली प्रेयसी आर्यांका होसपेठकर हिच्यावर रसायन फेकले होते. यामुळे तिच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. फेसबुकच्या माध्यमातून जॉन आणि आर्यांकाची ओळख झाली होती. एका हौशी सायकलींग ग्रुपमध्ये दोघे सदस्य होते. कालांतर या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण जॉनचे अगोदरच लग्न झालेलं होतं. त्याला पाच वर्षाचा मुलगा आहे. ही धक्कादायक माहिती आर्यांका कळताच तिने जॉनपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

आर्यांका आपल्यापासून दूर जात असल्याचं जॉनला राहवलं गेलं नाही. वारंवार तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आर्यांका त्याला टाळू लागली. दोन दिवसांपुर्वीच आर्यांकाने नाते तोडण्यासाठी जॉनला आपल्या घरी बोलावून घेतले होते. यावेळी तिची आई, धाकटा भाऊ आणि जवळचे मित्र सोबत होते. यावेळी जॉन आणि आर्यांकामध्ये वाद झाला. त्यानंतर दुसर्‍यादिवशी पहाटे जॉन आर्यांकाच्या घरी गेला आणि तिच्यावर रसायन फेकून पसारा झाला. आर्यांकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी जॉनच्या घरातून रसायनाचे नमुने वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवले असून सदरील रसायन ऍसिड नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. पण नेमकं रसायन काय होतं हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. जॉन हा मुळचा केरळचा. त्याने अनेक सिनेमात संकलनाचं काम केलं. तसेच करिअरच्या सुरूवातीला तो व्ही चॅनेलमध्ये काम करत होता. यानंतर त्याने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस उभारले या हाऊसमधून त्याने शॉर्टफिल्म तयार केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2012 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close