S M L

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ; प्रवाशांचे हाल

07 नोव्हेंबरऐन संध्याकाळी चाकारमान्यांनी घरची वाट धरली असता मध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे कोलमडली प्रवाशांची पुरती वाट लागली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनल ते दादरपर्यंतची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मजिदबंदराजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे लोकलसेवा साफ कोलमडली आहे. सर्व लोकल 10-15 मिनिट उशीरा सुरु आहे. मात्र दादरच्या पुढे सर्व लोकलसेवा धीम्या गतीनं सुरू आहे. सीएसटी ते दादर दरम्यानच्या स्टेशनवर लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पेंटाग्राफ दुरस्तीचं काम सुरू असून लवकर रेल्वेसेवा पुर्वपदावर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य सीसीएसटी स्टेशनवर प्रवाशांची एकच गर्दी उसळली आहे. काही प्रवाशांनी बेस्ट बस,टॅक्सीचा मार्ग स्विकारला पण बेस्ट बसेसही खच्चाकच भरून वाहू लागल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2012 01:49 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ; प्रवाशांचे हाल

07 नोव्हेंबर

ऐन संध्याकाळी चाकारमान्यांनी घरची वाट धरली असता मध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे कोलमडली प्रवाशांची पुरती वाट लागली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनल ते दादरपर्यंतची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मजिदबंदराजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे लोकलसेवा साफ कोलमडली आहे. सर्व लोकल 10-15 मिनिट उशीरा सुरु आहे. मात्र दादरच्या पुढे सर्व लोकलसेवा धीम्या गतीनं सुरू आहे. सीएसटी ते दादर दरम्यानच्या स्टेशनवर लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पेंटाग्राफ दुरस्तीचं काम सुरू असून लवकर रेल्वेसेवा पुर्वपदावर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य सीसीएसटी स्टेशनवर प्रवाशांची एकच गर्दी उसळली आहे. काही प्रवाशांनी बेस्ट बस,टॅक्सीचा मार्ग स्विकारला पण बेस्ट बसेसही खच्चाकच भरून वाहू लागल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2012 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close