S M L

2008 वर्ष रतन टाटांसाठी आव्हानात्मक

2 डिसेंबर मुंबईमाईक संगमाताज पॅलेसवर झालेला दहशतवादी हल्ला असो किंवा सिंगूरमध्ये नॅनो प्रकल्पाला झालेला तीव्र विरोध एकूणच हे 2008 वर्ष रतन टाटांसाठी आव्हानात्मक आणि दु:खदायक ठरलं. 22 अब्जाचे मालक असणा-या रतन टाटांना याच वर्षात अनेकदा काळाच्या आघातांना सामोरं जावं लागलं.ताजमहाल हॉटेल...जमशेदजी टाटांचं एक स्वप्नं...भारतात येणा-या परदेशी पर्यटकांसाठी उतरण्याचं एक हमखास ठिकाण... इतकंच नाही तर एक सुंदर वास्तूरचना असलेलं हे हॉटेल मुंबईची जणू एक ओळखंच होती. पण अतिरेक्यांनी या वास्तूत हिंसाचार करून ताजच्या शानदार प्रतिमेला काळीमा फासली. विदेशी पर्यटकांनी भारतापासून दूर रहावं यासाठीच त्यांनी हे हल्ले केले.ज्यांनी ज्यांनी ताज हॉटेलवर प्रेम केलं त्यांचीही भावना रतन टाटांसारखीच होती. टाटांच्या लक्झरी हॉटेल्सपैकी एक प्रमुख हॉटेल असणा-या या हॉटेलनं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय दर्जात भर घातली. पण अतिरेक्यांनी याच वैभवशाली हॉटेलवर उमटवलेले ओरखडे न विसरता येण्याजोगे आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये टाटा कंपनीला बहुचर्चित नॅनो प्रकल्प सिंगूरमधून बाहेर हलवणं भाग पडलं. तीव्र निदर्शनांमुळे सिंगूरमध्ये काम सुरू ठेवणं टाटांना अशक्य झालं होत. त्यानंतर जागतिक मंदीचं संकट टाटा ग्रुपसमोरही होतंच. ऑक्टोबरमध्ये टाटा मोटर्सची विक्री 20% नी घटली त्यामुळे कंपनीला जमशेदपूर आणि पुणे प्लाण्ट काही काळासाठी बंद ठेवावे लागले.देशात ही स्थिती तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही टाटा अडचणीत होतेच. त्यांना जग्वार आणि लँडरोव्हरचा ताबा घेण्यासाठी कर्जाची गरज भासली. आणि आता ताज पॅलेसला उभं करायचं आव्हान टाटांपुढे आहे. रतन टाटा सांगतात, ज्यावेळी ताजच्या ह्या वास्तूला आगीत लपेटलेलं पाहिलं तेव्हा मी खूप भावनाविवश झालो होतो.आम्ही ताज हॉटेलला त्याचं वैभव पुन्हा मिळवून देऊ. मग कितीही वेळ आणि पैसा लागला तरी चालेल.पण पुन्हा एकदा याचा दिमाख परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच हे वर्ष जरी चांगलं गेलं नसलं तरी पुढलं 2009 साल तरी चांगले दिवस दाखवेल असं या उद्योगांच्या बादशहाला वाटतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2008 03:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2008 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close