S M L

राजू शेट्टींचे सहकारमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

07 नोव्हेंबरराज्यात आता उस दराचं आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे. सहकार मंत्र्यांच्या कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी धरणं आंदोलन सुरु केलं आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या दराचा निर्णय लागल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. उसाला पहिला उचल 3000 हजार रुपये देण्यात यावी अशी प्रमुख मागणी शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान, उसाच्या प्रश्नावरून सध्या सुरू असलेलं आंदोलन चुकीचं आहे अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांनी चर्चेतून हा प्रश्न सोडवला पाहिजे, यात सरकारची काहीही भूमिका नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2012 11:24 AM IST

राजू शेट्टींचे सहकारमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

07 नोव्हेंबर

राज्यात आता उस दराचं आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे. सहकार मंत्र्यांच्या कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी धरणं आंदोलन सुरु केलं आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या दराचा निर्णय लागल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. उसाला पहिला उचल 3000 हजार रुपये देण्यात यावी अशी प्रमुख मागणी शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान, उसाच्या प्रश्नावरून सध्या सुरू असलेलं आंदोलन चुकीचं आहे अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांनी चर्चेतून हा प्रश्न सोडवला पाहिजे, यात सरकारची काहीही भूमिका नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2012 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close