S M L

विदर्भात औष्णिक प्रकल्पांचा फेरआढाव्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

11 नोव्हेंबरविदर्भात मोठ्याप्रमाणात सिंचनाचं पाणी औष्णिक वीजप्रकल्पांना वळवण्यात आलं आहे. त्यावर नाराजी व्यक्त करताना असे राजकीय निर्णय यापूर्वी झालेले आहेत. त्यामुळेच आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांना केंद्रीय जलनियामक आयोग स्थापन करण्याची विनंती केलीये असा आयोग स्थापन झाल्यास राज्यातले जलनियमक मंडळ आयोगाच्या कार्यक्षेत्रात येतील आणि पाण्याचं वाटप प्राधान्यक्रमानं होऊ शकेल असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलं. विदर्भातल्या प्रस्तावित औष्णिक ऊर्जाप्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.विदर्भात मोठ्या प्रमाणात औष्णिक वीजप्रकल्प येत असून त्यांना सिंचनाचं पाणी वळवण्यात आल्याची बाब आयबीएन लोकमतनं उघड केली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. '2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त'तसेच डिसेंबर 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त होणारच यासाठी पाणी, कोळसा आणि गॅसच्या कमतरतेमुळे अडथळे येत असले तरी 2012 ची डेडलाईन सरकार पाळणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2012 10:25 AM IST

विदर्भात औष्णिक प्रकल्पांचा फेरआढाव्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

11 नोव्हेंबर

विदर्भात मोठ्याप्रमाणात सिंचनाचं पाणी औष्णिक वीजप्रकल्पांना वळवण्यात आलं आहे. त्यावर नाराजी व्यक्त करताना असे राजकीय निर्णय यापूर्वी झालेले आहेत. त्यामुळेच आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांना केंद्रीय जलनियामक आयोग स्थापन करण्याची विनंती केलीये असा आयोग स्थापन झाल्यास राज्यातले जलनियमक मंडळ आयोगाच्या कार्यक्षेत्रात येतील आणि पाण्याचं वाटप प्राधान्यक्रमानं होऊ शकेल असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलं. विदर्भातल्या प्रस्तावित औष्णिक ऊर्जाप्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.विदर्भात मोठ्या प्रमाणात औष्णिक वीजप्रकल्प येत असून त्यांना सिंचनाचं पाणी वळवण्यात आल्याची बाब आयबीएन लोकमतनं उघड केली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते.

'2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त'

तसेच डिसेंबर 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त होणारच यासाठी पाणी, कोळसा आणि गॅसच्या कमतरतेमुळे अडथळे येत असले तरी 2012 ची डेडलाईन सरकार पाळणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2012 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close