S M L

पिंपरीत पळवलेलं बाळं सापडलं, महिलेला अटक

09 नोव्हेंबरपिंपरी चिंचवडमध्ये हॉस्पिटलमधून पळवण्यात आलेल्या बाळाचा अखेर शोध लागला आहे. याप्रकरणी आत्मा कांबळे या महिलेला अटक करण्यात आली आहे. आपल्याला मूल होत नसल्यामुळे तिनं बाळाची चोरी केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पिंपरीतल्याच कवळे इथल्या काशीनाथ काटे चाळीत या महिलेच्या घरी जाऊन पोलिसांनी तिला अटक केली आणि बाळाला ताब्यात घेतलं. या बाळाच्या सर्व तपासण्या करण्यात आल्यानंतर त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आलं. पिंपरी-चिंचवडमधल्या वायसीएम हॉस्पिटलमधून एक दिवसाचं हे बाळ चोरीला गेलं होतं. बाळ चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज जारी केलं होतं त्यावरूनच बाळ शोधायला मोठी मदत झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2012 11:45 AM IST

पिंपरीत पळवलेलं बाळं सापडलं, महिलेला अटक

09 नोव्हेंबर

पिंपरी चिंचवडमध्ये हॉस्पिटलमधून पळवण्यात आलेल्या बाळाचा अखेर शोध लागला आहे. याप्रकरणी आत्मा कांबळे या महिलेला अटक करण्यात आली आहे. आपल्याला मूल होत नसल्यामुळे तिनं बाळाची चोरी केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पिंपरीतल्याच कवळे इथल्या काशीनाथ काटे चाळीत या महिलेच्या घरी जाऊन पोलिसांनी तिला अटक केली आणि बाळाला ताब्यात घेतलं. या बाळाच्या सर्व तपासण्या करण्यात आल्यानंतर त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आलं. पिंपरी-चिंचवडमधल्या वायसीएम हॉस्पिटलमधून एक दिवसाचं हे बाळ चोरीला गेलं होतं. बाळ चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज जारी केलं होतं त्यावरूनच बाळ शोधायला मोठी मदत झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2012 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close