S M L

'राज-उद्धव एकत्र आल्यास महायुतीचा फेरविचार करावा लागेल'

11 नोव्हेंबरआमच्या महायुतीमध्ये चौथ्या भागीदाराची गरज नाही. भविष्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपल्याला महायुतीबाबत वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दिला. ते सोलापूरमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी मनसेनं महायुतीसोबत यावं असं वक्तव्य भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. आठवलेंनी याअगोदरही औरंगाबादमध्ये महायुतीत असा बदल झाल्यास महायुतीचा विचार करावा लागेल असा इशारा दिला होता. आठवलेंच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2012 11:02 AM IST

'राज-उद्धव एकत्र आल्यास महायुतीचा फेरविचार करावा लागेल'

11 नोव्हेंबर

आमच्या महायुतीमध्ये चौथ्या भागीदाराची गरज नाही. भविष्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपल्याला महायुतीबाबत वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दिला. ते सोलापूरमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी मनसेनं महायुतीसोबत यावं असं वक्तव्य भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. आठवलेंनी याअगोदरही औरंगाबादमध्ये महायुतीत असा बदल झाल्यास महायुतीचा विचार करावा लागेल असा इशारा दिला होता. आठवलेंच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2012 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close