S M L

नागपुरातील मुलं चालली ऑस्ट्रेलियाला

2 डिसेंबर नागपूरअखिलेश गणवीरझोपडपट्टी म्हणजे दारिद्र्य, गुंडगिरी... फक्त नावं ऐकलं तरीही अनेकजण नाक मुरडतात. पण याच झोपडपट्टीत राहणा-या मुलांनी सर्वांना आता तोंडात बोटं घालायला लावली आहेत. नागपूरमधील झोपडपट्टीतले प्लेअर्स आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन भारताचं नाव जगात चमकवायला सज्ज झाले आहेत.जगातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. पण क्रिकेटवेड्या भारताला फुटबॉलमध्ये मात्र फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पण आता हे चित्र बदलणार आहे. यासाठीच नागपूर इथली निराधार मुलं तयारी करत आहेत. नागपूरपासून जवळच असलेल्या गोधना बोखारा इथं या खेळाडूंचा सराव सुरू आहे.नागपूरच्या झोपडपट्टीत राहणा-या या फुटबॉलपट्टूना वर्ल्ड कप खेळायची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात होणा-या 6व्या होमलेस वर्ल्ड कपसाठी खेळायला त्यांना संधी मिळाली आहे. आणि त्यासाठी ते जोरदार सराव करत आहेत. जागतिक फुटबॉलमध्ये भारताचं नाव मोठं करण्याची इथल्या मुलांची प्रचंड इच्छा होती. पण परिस्थिती अभावी ते शक्य झालं नाही. पण आता ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये होणा-या या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत 54 देशातील टीमच्या स्पर्धेत ही टीम सहभागी होणार आहेत. ब्लॅक पर्ल म्हणून प्रसिध्द असलेला फुटबॉलचा शहनशाहा पेले या खेळाडूंचा आदर्श आहे. भारतीय फुटबॉल टीम भविष्यात वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल की नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पण सध्यातरी होमलेस वर्ल्ड कपसाठी तयारी करणारी भारताची ही टीम चांगली कामगिरी करेल अशी आशा करू या...

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2008 03:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2008 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close